पीटीआय, नवी दिल्ली
शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना राणावत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून फटकारल्यानंतर कंगना यांनी गुरुवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. कंगना यांनी भाजप अध्यक्षांची भेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. कंगना यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला तीन रद्द केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कथित अपमानास्पद टिप्पणी करून वादाला तोंड फोडले होते. कंगना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली लोक हिंसाचार पसरवत आहेत आणि तेथे बलात्कार आणि हत्या होत आहेत. या मुलाखतीची चित्रफीतही त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली होती.

हेही वाचा : Haryana Politics : हरियाणात भाजपा की काँग्रेस? दुष्यंत चौटाला अन् चंद्रशेखर आझाद यांच्या युतीमुळे कुणाचे ‘टेन्शन’ वाढवणार?

bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
jharkhand assembly elections BJP game plan
Jharkhand: भाजपाचा झारखंडसाठी गेम प्लॅन तयार; हेमंत सोरेन यांना आगामी निवडणुकीत धक्का बसणार?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

त्यात त्यांनी म्हटले होते की, देशाचे नेतृत्व मजबूत नसते तर भारतातही ‘बांगलादेशसारखी परिस्थिती’ निर्माण होऊ शकते. तसेच त्यांनी चीन आणि अमेरिकेवर ‘कारस्थान’ केल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावर झालेल्या वादानंतर भाजपने राणावत यांच्या विधानावर असहमती व्यक्त करत वादापासून दूर राहणे पसंत केले होते. भविष्यात असे कोणतेही वक्तव्य करू नये, अशा सूचनाही पक्षाने कंगनांना दिल्या. यानंतर, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी पक्षाला राणावत यांची हकालपट्टी करण्यास सांगितले.