संतोष प्रधान

भाजप नेते किरीट सोमय्या बोले आणि सक्तवसुली संचलनायल म्हणजेच ‘ईडी’ हाले हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे. अनिल देशमुख, अनिल परब, संजय राऊत यांना ‘हिसाब देना पडेगा’ असे सोमय्या जाहीर करतात आणि लगेचच ‘ईडी’ची कारवाई होते हा योगायोग की अन्य काही, असाच सवाल त्यातून उपस्थित होतो.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आघाडी उघडली होती. साखर कारखान्यातील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे कुटुंबिय, अनिल परब, हसन मुश्रीफ, आस्लम शेख आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात मोहिम उघडणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते.

हेही वाचा… कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विशिष्ट जातीच्या…”

सोमय्या बोलले आणि केंद्रातील ‘ईडी’चे अधिकारी दक्ष झाले. अनिल परब यांची दापोलीतील रिसोर्टची मालमत्ता जप्त करण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी बुधवारी धाडी टाकण्यात आल्या. किशोरी पेडणेकर व त्यांच्या मुलाच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत. याचाच अर्थ किरीट सोमय्या बोलले की ईडी किंवा सरकारी यंत्रणा कारवाया करतात.

हेही वाचा… भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या विरोधात भाजपकडून किरीट सोमय्या यांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच भाजपचे सोमय्या यांना ईशान्य पुन्हा उमेदवारी नाकारली होती. म्हणजेच गरज असेल तेव्हा सोमय्या यांचा वापर करायचा आणि अन्य वेळी फेकून द्यायचे असाच काहीसा प्रकार सोमय्या यांच्याबाबत झाला आहे. महाविकास आघाडी नेत्यांच्या मागे लागल्यानेच भाजप नेत्यांनी त्यांना ४० पोलिसांचे संरक्षण दिले आहे. एवढी सुरक्षा आवश्यक आहे का ? सोमय्या यांच्या सुरक्षेवर होणारा खर्च हा एक प्रकारे जनतेच्या पैशांचा अपव्ययच असल्याची टीका केली जाते.

हेही वाचा… “कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या आशीर्वादाने हसन मियांचं…”, ED छापेमारीनंतर किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेक आरोप केले होते. सोमय्या हे बिल्डर असून, त्यांच्या प्रकल्पातील गैरप्रकार राऊत यांनी उघडकीस आणले होते. राऊत यांनी आरोप केले तेव्हा त्यांच्याच पक्षाचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. पण राऊत यांच्या दुर्दैवाने सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप होऊनही त्यांची साधी चौकशी महाविकास आघाडीचे सरकार करू शकले नाही. उलट संजय राऊत यांनाच ईडीने अटक करून तुरुंगात टाकले होते.

हेही वाचा… सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

किरीट सोमय्या यांच्यावर यापूर्वीही अनेक आरोप झाले. त्यांच्या संस्थेवर गैरव्यवहारांचे आरोप झाले.‘ सोमय्या ज्या प्रकारे एखाद्याच्या मागे हात धुवून मागे लागतात तसे त्यांच्यावरील आरोपांचा कोणी नेत्याने पाठपुरावा करीत नाही वा केला नाही. यामुळेच सोमय्या यांचे फावते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका नेत्याने मागे व्यक्त केली होती.

सध्या तरी किरीट सोमय्या यांची भवीष्यवाणी खरी ठरते हे अनुभवास येते. हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी काय कारवाई होते हे कालांतराने समजलेच. अनिल परब हे जेरीस आले आहेत. आता पुढचा क्रमांक कोणाचा याकडेच राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader