J&K Assembly Election 2024 : जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचारालाही सुरुवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. अशातच भाजपाचे नेते राम माधव यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत नवं नेतृत्व उदयास येईल, असं भाकीत केलं आहे.

तसेच नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (PDP) विधानसभा निवडणुकीमध्ये दहशतवादाचा इतिहास असलेल्यांनी पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोपही राम माधव यांनी केला आहे. एवढंच नाही, तर दहशतवादाचा इतिहास असलेल्यांनी उघडपणे ‘एनसी’ आणि ‘पीडीपी’चा प्रचार करीत असल्याचंही राम माधव यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना राम माधव म्हणाले, “दहशतवादाचा इतिहास असलेल्यांनी एनसी आणि पीडीपी पार्टीला उघडपणे पाठिंबा देत असल्याचं आम्ही पाहत आहोत. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसाठी खुलेआम प्रचार करीत आहेत. जम्मू-काश्मीरला भूतकाळात घेऊन जाऊ इच्छिणाऱ्या पक्षांना लोकांनी पराभूत केले पाहिजे. शांतता आणि विकास हवा असलेल्या नव्या नेतृत्वाला पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यांचा या निवडणुकीत पराभव करावा लागेल”, असा इशाराही राम माधव यांनी ‘एनसी’ व ‘पीडीपी’ला दिला.

Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024,
निवडणुकीच्या मैदानात तिरंगी-चौरंगी लढतीची रंगत; अकोला वाशीम जिल्ह्यातील आठही मतदारसंघात चुरस
Who is Anil Deshmukh : काटोलमध्ये सलीलविरुद्ध अर्ज दाखल करणारे ‘अनिल देशमुख’ कोण आहेत ?
congress observers mla ram mohan reddy
Hingoli Assembly Constituency : काँग्रेसच्या निरीक्षकांना भेटण्यास माजी आमदार गोरेगावकरांचा नकार, लढवण्यावर ठाम

हेही वाचा : काश्मीरला राज्याचा दर्जा ही सामूहिक जबाबदारी! प्रचारसभेत राहुल गांधी यांचे प्रतिपादन

नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं जारी केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये कलम ३७० चा दर्जा पुन्हा देणं आणि काश्मीरमधील समस्येचं निराकरण करणं आणि पाकिस्तानशी चर्चा करण्यासह आदी आश्वासनं देण्यात आल्याचा आरोपही राम माधव यांनी केला. दरम्यान, राम माधव यांच्या आरोपांवर ‘पीडीपी’च्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. पीडीपीचे नेते म्हणाले, “भाजपाला प्रचार करण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण- काश्मीरमधील त्यांच्या तथाकथित केडरमध्ये बहुतांश आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना प्रचाराचा अधिकार नाही, तर नॅशनल कॉन्फरन्सने म्हटलं की, राम माधव यांच्या टिप्पण्यांवरून असं सूचित होतं की, जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष सामोरा जाण्यास घाबरत आहे.”

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राम माधव यांनी घाटीचा दौरा केला. यावेळी ते म्हणाले, “शांतता आणि विकासाची इच्छा असलेलं नवीन नेतृत्व उदयास आलं पाहिजे. त्यासाठी जम्मू-काश्मीरच्या लोकांना पुढे यावं लागणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवं नेतृत्व उदयास येईल. ज्यांना शांतता हवी आहे ते दहशतवादाचं समर्थन करीत नाहीत. ज्यांना विकास हवा आहे, असे नवे लोक, नवे पक्ष व नेते काश्मीरमध्ये उदयास येतील. शांतता आणि विकासाचे प्रतिनिधी असलेल्या जम्मूमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल आणि पक्षाच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन होईल”, असा मोठा दावाही राम माधव यांनी केला.

नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला जबाबदार धरून भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं, “जम्मू-काश्मीरच्या लोकांना एका शोकांतिकेचा सामना करावा लागला आहे. या ऐतिहासिक निवडणुका आहेत. मला खात्री आहे की, ज्या कुटुंबांमुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना गेल्या जवळपास ३० ते ४० वर्षांत दुःखाचा सामना करावा लागला, त्या कुटुंबांना या निवडणुकीत लोक बाहेरचा रस्ता दाखवतील.” तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या कुटुंबांचा संदर्भ देत राम माधव यांनी म्हटलं, “जम्मू आणि काश्मीर हे दोन कुटुंबांच्या ताब्यात होते. आता त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची गरज आहे.” दरम्यान, बंदी घालण्यात आलेली संघटना जमात-ए-इस्लामी निवडणुकीच्या राजकारणात परतण्याच्या निर्णयावर राम माधव यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले, “जो कोणी लोकशाही प्रक्रियेत सामील होईल, त्याचं स्वागत आहे.”

हेही वाचा : J&K Assembly Election 2024: वडिलांची हत्या, स्वत:वर १५ वेळा जीवघेणा हल्ला, पक्षाची पाचव्यांदा उमेदवारी; कोण आहेत नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवार सकिना इटू?

राम माधव यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते नईम अख्तर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “राम माधव काहीही बोलू शकतात. मात्र, त्यांना ‘पीडीपी’चा एक प्रश्न आहे. आम्ही सर्वसमावेशक राजकारणाच्या बाजूनं आहोत. दहशतवादाचा इतिहास असलेले मात्र, नंतर ते मुख्य प्रवाहात आले आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली, तर (फुटीरतावादी) जपाची योजना काय आहे?”, असा सवाल त्यांनी केला.

नईम अख्तर पुढे म्हणाले, “जम्मू-काश्मीर विधानसभेत फुटीरतावादी परतल्याची पुरेशी उदाहरणं आहेत. जे परत (मुख्य प्रवाहात) आले आणि त्यांचे स्वागत केले जात आहे. त्यांचे सज्जाद लोन हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. असे काही लोक आहेत जे (मुख्य प्रवाहात) परत आले आहेत आणि त्यांचे स्वागत केले गेले. खरं तर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला काय करावे आणि काय करू नये हे सांगणं राम माधव यांचं काम नाही. आम्ही एक स्वतंत्र पक्ष आहोत, जो सलोखा आणि तणाव कमी करण्याच्या बाजूने आहे. मात्र, त्यांच्या (भाजपा) तथाकथित केडरमध्ये (काश्मीरमध्ये) बहुतांश आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. सज्जाद लोन उन हे भाजपाचे सहयोगी होते आणि मागील पीडीपी-भाजपा युती सरकारमध्ये त्यांच्या कोट्यातून मंत्री होते. माधव हेच होते, ज्यांनी पीडीपीबरोबरचा युतीचा अजेंडा (२०१४ मध्ये त्यांच्या युती सरकारसाठी) अंतिम केला होता; ज्याचा पहिला मुद्दा होता जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा टिकवून ठेवणे आणि शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी त्यांना सामील करून घेणे. पण ते यापासून पळू शकत नाहीत. आम्ही एकाच अजेंड्यावर आहोत; मात्र आम्ही भाजपासारखे नाही”, असंही नईम अख्तर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे मुख्य प्रवक्ते तन्वीर सादिक यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “ते (भाजपा) घाबरले आहे. कदाचित त्यांना जम्मूमध्ये काही पाठिंबा मिळवायचा असेल. कारण- त्यांना मीहित आहे की, काश्मीरमध्ये त्यांचा युक्तिवाद कोणीही मान्य करणार नाही.”