सोलापूर : सोलापूर जिल्ह्याशी संबंधित सोलापूरसह माढा आणि धाराशिव या तिन्ही लोकसभा जागांवर भाजपसह महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. परंतु त्या अगोदर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख सत्ताकेंद्र असलेली सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती आणि शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती भाजपचे आमदार विजय देशमुख तर बार्शी कृषिउत्पन्न बाजार समिती तेथील भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात असून ही दोन्ही महत्वाची सत्ताकेंद्रे राखण्याच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

वार्षिक उलाढाल सुमारे दीड हजार कोटींच्या घरात असलेल्या आणि राज्यात चौथ्या क्रमांकाची म्हणून गणल्या जाणाऱ्या सोलापूर कृषिउत्पन्न समितीचे कार्यक्षेत्र सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यापुरते मर्यादित आहे. १९६२ स्थापना झाल्यापासून ही बाजार समिती काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताब्यात अबाधित राहिली असताना मागील २०१८ साली झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तत्कालीन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजय देशमुख हे दोघे भाजपचे नेते एकमेकांच्या विरूध्द शड्डू ठोकून उभे होते. आमदार विजय देशमुख हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या पॅनेलमध्ये होते. तर आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतःच्या ताकदीवर स्वंतंत्र पॅनेल उभे केले होते. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पॕनेलची सरशी झाली तर आमदार सुभाष देशमुख गटाला दारूण पराभव पत्करावा लागला होता. तत्पूर्वी, तत्कालीन तत्कालीन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या कारभाराच्या चौकशीचा ससेमिरा लावून प्रस्थापित सत्ताधा-यांना जेरीला आणले होते. तत्कालीन आजी-माजी संचालकांसह काही अधिका-यांवर गुन्हेही दाखल झाले होते. सुभाष देशमुख यांनी मंत्रिपदाच्या अधिकारात कृषिबाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनाही मतदानाचा अधिकार मिळवून दिला होता.

In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
pune vidhan sabha campaigning
प्रचाराचा प्रवास… तालीम ते गुन्हेगारी टोळ्या
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
maharashtra assembly election 2024 fight between Rohit Pawar and Ram Shinde will be significant
रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील लढत लक्षणीय

हेही वाचा…पुरवणी मागण्यांचा पाऊस; अर्थसंकल्प मंजूर होताच ९५ हजार कोटींच्या मागण्या सादर, मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यासाठी १४,५९५ कोटी

या पार्श्वभूमीवर मागील संचालक मंडळाच्या निवडणुकीत पुन्हा प्रस्थापितांचे वर्चस्व कायम राहिले असता नंतर काही महिन्यातच परिस्थितीनारूप बाजार समितीचे सभापतिपद आमदार विजय देशमुख यांच्याकडे चालत आले. पुढे योगायोगाने शासनाकडून कारवाईची चक्रेही थंडावली. आमदार विजय देशमुख हे सभापती असताना बाजार समितीला कधी पावसाळा तर कधी दुष्काळाचे कारण देऊन शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. सोलापूरप्रमाणे बार्शी कृषिउत्पन्न बाजार समितीलाही मुदतवाढ मिळाली होती.

येत्या १४ जुलै रोजी सोलापूर व बार्शी बाजार समित्यांची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने या दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया हाती घेऊन प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. येत्या २४ जुलै अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

सोलापूर कृषिबाजार समितीच्या निवडणुकीत आमदार विजय देशमुख हे पुन्हा काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाबरोबर पुन्हा एकत्र येणार की दुसरी वाट चोखाळणार, हे अद्यापि गूलदस्त्यात आहे. महाविकास आघाडीची आमदार विजय देशमुख यांना सोबत घेणार किंवा कसे, याबाबतची उत्सुकता कायम आहे. भाजप पक्षांतर्गत आमदार विजय देशमुख यांचे विरोधक आमदार सुभाष देशमुख हेसुध्दा शांत आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची असून त्यांनी लक्ष घातल्यास दोन्ही देशमुख एकत्र येऊ शकतात, असा आशावाद भाजपची मंडळी बाळगून आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व प्रमुख नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. विविध कार्यकारी संस्था मतदारसंघ-१८९५, ग्रामपंचायत सदस्य मतदार-१२९४, व्यापारी मतदारसंघ-१२७६ आणि हमाल व तोलार मतदारसंघ-१०८५ याप्रमाणे एकूण ५४७० मतदारांची प्रारूप यादी प्रसिध्द झाली असून त्यावर हरकती मागविण्यात येत आहेत.

हेही वाचा…कायदेशीर मत आजमावल्यावरच ‘सगेसोयरे’वर अंतिम अधिसूचना ; विरोधकांचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार

मागील २०१८ सालच्या बार्शी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सध्या शिसेना उध्दव ठाकरे गटात असलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर मात करून भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊन यांनी बाजी मारली होती. आता पुन्हा हे सत्ताकेंद्र ताब्यात राहण्यासाठी आमदार राऊत आणि सोपल यांच्यात मोठा संघर्ष होण्याची अपेक्षा आहे. बार्शी विधानसभा क्षेत्र शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बार्शीतून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांना ५४ हजार १९० मतांची मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे दिलीप सोपल गट आता आगामी बार्शी विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहाने तयारीला लागला आहे. यातच बार्शी कृषिउत्पन्न बाजार समितीही राऊत गटाच्या ताब्यात घेण्यासाठी सोपल गटाने कंबर कसली आहे. तर राऊत गटानेही ताकद पणाला लावून विधानसभा आणि कृषीबाजार समिती दोन्ही सत्ताकेंद्रे कायम राखण्यासाठी राजकीय डावपेचआखायला सुरूवात केली आहे. बार्शी बाजार समितीमध्ये एकूण ५४६१ मतदारांची प्रारूप यादी समोर आली आहे. यात विविध कार्यकारी संस्था मतदारसंघ-१६६१, ग्रामपंचायत सदस्य मतदार-१०५६ व्यापारी मतदारसंघ-१७२३ आणि हमाल व तोलार मतदारसंघ-१०२१ यांचा समावेश आहे.