कात्रीत सापडलेल्या पश्चिम बंगाल भाजपासाठी नवनिर्वाचित राष्ट्रीय सहसचिव सुनील बन्सल यांचा पुढच्या आठवड्यातील दौरा दिलासादायक ठरणार आहे.  केंद्रीय नेतृत्वाचे कथित दुर्लक्ष आणि सततच्या प्रतिकूल वातावरणामुळे डळमळीत झालेल्या राज्य युनिटला या दोन दिवसीय दौऱ्यामुळे उभारी मिळणार असल्याचे पक्ष सदस्यांकडून बोलले जाते.

बन्सल यांना पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणची जबाबदारी देण्यात आली असून आपण २९ आणि ३० ऑगस्ट रोजी “प्रशिक्षण कार्यक्रम”साठी पश्चिम बंगालला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बंगाल भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे की, २०१४ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यात बन्सल यांनी मुख्य भूमिका बजावली होती. त्यांची नियुक्ती २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षाला मोठी उभारी देणारी असेल. २०१९ मध्ये भाजपाने १८ लोकसभा जागा खिशात घातल्यानंतर मतांचे दान पदरात पाडून घेण्यात म्हणावे तसे यश आले नाही.   सतत आवश्यक ते साह्य केंद्रातील नेतृत्वाकडून झुगारून देण्यात आल्याने सत्ताधारी तृणमूल कॉँग्रेसच्या शक्तिशाली रणनितीपुढे भाजपा फिकी पडल्याचा उद्वेग भाजपा कार्यकर्त्याने बोलून दाखवला.  

मागील वर्षी मतदानाचा निकाल लागल्यानंतर सुरू झालेल्या हिंसाचारात भाजपाच्या कार्यकर्त्यांना उघड्यावर टाकण्यात आल्याचा आरोपही राज्यातील भाजपा नेत्यांनी केंद्रातील नेतृत्वावर केला. बन्सल यांच्या अगोदर पदाची सांभाळणाऱ्या कैलाश विजयवर्गीय यांनी २०१५ पासून पश्चिम बंगालमध्ये भाजपा मजबूत करून लोकसभेत १८ जागा खिशात घालण्याचे श्रेय मिरवले. मात्र राज्यातील निवडणुकीत पराजय झाल्यावर राज्यात पाऊल ठेवले नाही. शिवाय त्यांच्यावर अनेक पोलिस केसही दाखल असल्याची माहिती राज्यातील नेत्यांनी दिली.

राज्याच्या विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी महिन्याच्या पूर्वार्धात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी केंद्र नेतृत्वाने राज्यात त्वरीत लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर आठवड्यातच बन्सल यांना बंगाल भाजपाचा पदभार सोपविण्यात आला. राष्ट्रीय राजकारणात दबदबा कायम ठेवायाचा असल्यास पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि तेलंगण लोकसभेच्या सर्वाधिक जागा ताब्यात घेतल्या पाहिजेत असेही पक्षाच्या सूत्रांकडून समजते.

Story img Loader