West Bengal BJP Assembly Bypolls : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं असलं तरी पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत सपाटून मार खावा लागला. १३ नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या ६ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाने (TMC) दमदार कामगिरी करत सर्वच जागांवर विजय मिळवला. यामुळे राज्यात भाजपाला सातत्याने येणारे अपयश समोर आलं असून पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने केवळ सर्व ६ जागाच जिंकल्या नाहीत, तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत विजयाचे अंतरही वाढवले. विशेष बाब म्हणजे, सीताई आणि हरोआ जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाचा फरक १ लाखांहून अधिक होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इतकंच नाही तर, तृणमूल काँग्रेस पक्षाने भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या उत्तर बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यातील मदारीहाट विधानसभा मतदारसंघाला देखील सुरुंग लावला. २०१६ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाचा विजय झाला होता. यावेळी मात्र तृणमूल काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. मदारीहाटची जागा जिंकण्याची ही तृणमूल काँग्रेसची पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे, उत्तर बंगालमधील कूचबिहार मतदारसंघात मोठी ताकद असूनही भाजपाला सीताईची जागा गमावावी लागली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाने आक्रमक प्रचार करत महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येचा मुद्दा देखील उचलून धरला होता.

हेही वाचा : Delhi Election 2025 : महाराष्ट्र आणि झारखंडच्या निकालांनंतर केजरीवाल सतर्क; भाजपाला शह देण्यासाठी ‘आप’चा मास्टर प्लान

भाजपाने आखली होती खास रणनिती

ऑगस्टमध्ये कोलकाता येथील एका रुग्णालयात ज्युनियर महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेचा कनिष्ठ डॉक्टर आणि राज्यातील नागरिकांनी अनेक आठवड्यांपर्यंत निषेध केला होता. याच काळात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्रकरणे सुद्धा चांगलीच गाजली होती. मात्र, भाजपाने उचलून धरलेले हे मुद्दे पक्षाचे नशीब पालटू शकले नाही. याआधी १० जुलै रोजी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपाने ४ जागा गमावल्या होत्या. यापैकी ३ जागा राणाघाट दक्षिणेतील नादिया जिल्ह्यातील होत्या. २०२१ मधील निवडणुकीत भाजपाने उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बगदाह आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज जागांवर विजय मिळवला होता. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतही भाजपाला याच भागातून आघाडी मिळाल्याने त्यांचे ४२ पैकी १२ जागांवर उमेदवार निवडून आले होते.

२०१९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाला १८ जागांवर विजय मिळवता आला होता, त्यावेळी भाजपाच्या मतांची टक्केवारी ४०.२५ इतकी होती, तर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत ही टक्केवारी ३८.७३ पर्यंत घसरली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने २०१९ मध्ये ४३.२७ टक्के मतांसह २२ जागा जिंकल्या होत्या. २०२४ मधील निवडणुकीत या जागांची संख्या २९ पर्यंत गेली. यावेळी त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ही ४५.७६ टक्के इतकी होती. भाजपाला २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत केलेली कामगिरी २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टिकवून ठेवण्यास अपयश आलं. परंतु, या निवडणुकीत भाजपाने २९२ पैकी ७७ जागा जिंकल्या आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने २१५ जागा जिंकून विजयाची हॅटट्रिक केली.

पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने पक्षातील एका गटाने राज्यातील नेतृत्वात बदल करण्याची मागणी सुरू केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांना ते लक्ष्य करीत आहेत. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, “लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमच्याकडे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कोणतेही ठोस नियोजन नव्हते. त्यामुळे साहजिकच आम्ही या निवडणुकांमध्ये पराभूत होत असून आमच्या मताधिक्यातही सातत्याने घसरण होत आहे. हाच कल कायम राहिला तर आम्हाला २०२६ मधील विधानसभा निवडणुकीत मोठे नुकसान सहन करावे लागेल”. केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांना लक्ष्य करत भाजपाच्या काही नेत्यांनी राज्याला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावा अशी मागणी करीत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मजुमदार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथागत रॉय यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “पश्चिम बंगाल हे भाजपाचे डळमळीत घर असून येथे पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यामागचे कारण संघटना नसून हिंदू जनतेचे अंध समर्थन आहे. हे अकल्पनीय आहे की, पश्चिम बंगालसारखे राज्य भाजपाचे अर्धवेळ अध्यक्ष चालवत आहेत. जे केंद्रात राज्यमंत्री म्हणूनही काम पाहत आहेत. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सिद्ध झालेले खटले स्पष्टपणे दिसूनही ममता बॅनर्जी यांच्यात केंद्रीय नेतृत्वापेक्षा जास्त समजूतदारपणा असल्याचा जनतेमध्ये विश्वास झाला निर्माण आहे. जोपर्यंत त्यांचा हा विश्वास बदलत नाही, तोपर्यंत राज्यात भाजपाला सत्ता मिळण्याची कोणतीही आशा नाही. ममता यांनी असा अपप्रचार केला आहे की भाजपा हा बंगालींविरोधातील पक्ष आहे. त्यामुळे त्या कायम येथे राज्य करतील”, तथागत रॉय यांनी विधानसभेचे विरोधीपक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची राज्य पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. मजुमदार आणि अधिकारी यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत.

हेही वाचा : महाविकास आघाडीत दुभंग? शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचा स्वबळावर लढण्याच सूर

प्रदेशाध्यक्ष बदलण्याची भाजपा नेत्यांची मागणी

भाजपाचे आमदार अग्निमित्र पॉल म्हणाले की, “पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे कोणी असेल त्यांनी या सरकारच्या नजरेला नजर भिडवून लढावे, अशी आमची इच्छा आहे.” भाजपाचे माजी खासदार अर्जुन सिंह यांनीही पुढील दीड वर्षांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सामना करण्यासाठी योग्य नेतृत्व आणि बूथ पातळीवर काम करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार म्हणाले, “या पोटनिवडणुका असून साहाजिकच असे निकाल येतात. पण २०२६ मध्ये आम्ही नक्कीच विजय मिळवून अशी आशा आहे. पक्षाने मला दिलेले काम मी करत असून प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी एक प्रक्रिया आहे. त्या पद्धतीनुसार भाजपा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. काही लोकांकडे काम नसून ते नेहमीच अशी आरडाओरड करतात.”

२०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलीप घोष यांच्या जागी सुकांत मजुमदार यांच्या हाती प्रदेशाध्यपदाची कमान सोपवली आहे. त्यानंतर मजुमदार यांनी घोष यांच्या निकटवर्तीयांना बाजूला सारून राज्यात भाजपची नवी टीम उभी केली. दरम्यान, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत कलहाचा समाचार घेत तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष म्हणाले, “हिवाळ्याच्या दिवसांत कोलकात्यात सर्कस येते. यावेळीही ती आली असून काही जोकर ओरडत असल्याचं दिसतंय. आम्ही याचा आनंद घेत आहोत”.