BJP leaders : हरियाणातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा व माजी सहकारी पक्ष असलेला जेजेपी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भाजपाला हा रोष भोवणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

हरियाणात भाजपाला तिसऱ्यांदा जिंकायचं आहे

हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅटट्रिक करायची भारतीय जनता पार्टीची मनिषा आहे. परंतु, गेल्या काही आठवड्यांमध्ये तिकिट न मिळाल्याने बंडखोरी केलेल्या उमेदवारांची संख्या वाढल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्याखेरीज भाजपाच्या महत्त्वाच्या अनेक उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. या लोकक्षोभाच्या झळा भाजपाचा आधीचा सहकारी पक्ष असलेल्या जननायक जनता पार्टी (जेजेपी) या पक्षालाही बसत आहेत.

mla kisan kathore meet cm eknath shinde
स्थानिक शिवसैनिक विरोधात, मात्र कथोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
BJP, MLA Kishor Jorgewar; hansraj Ahir, sudhir Mungantiwar,
आमदार किशोर जोरगेवार यांच्यावरून भाजपमध्ये गटबाजी; अहीर यांचे समर्थन, मुनगंटीवार विरोधात
BJP leader Vasantrao Deshmukh on Jayashree Thorat
Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप
Mahayuti Bhandara, Narendra Bhondekar,
भंडाऱ्यात महायुतीतील नाराजीच्या ठिणगीचे वणव्यात रुपांतर! नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी
article Shiv Sena MLA Shahaji Bapu Patil denies links to cash seizure
उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…
shetkari kamgar paksha announced 5 candidates for assembly election
शेकाप ‘मविआ’तील समावेशाबाबत आशावादी; विधानसभेसाठी पाच उमेदवारांची घोषणा

२०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपा आणि जेजेपीची युती

२०१९ च्या निवडणुकांनंतर भाजपा व जेजेपीनं युती केल्यानंतर पंजाब सीमेवरील खनौरी येथे शेतकऱ्यावर झालेल्या गोळीबारापासून दोन्ही पक्षांना अनेक प्रकारच्या निदर्शनांना तोंड द्यावे लागत आहे. विरोधी पक्ष लोकांना भडकावत असून अशा निदर्शनांचा उपयोग राजकारणासाठी करत असल्याचे भाजपा सांगत असून ‘ही लोकशाही आहे’, असा काँग्रेसचा त्यावर प्रतिवाद आहे.

आमदपूर मतदारसंघात काय चाललं आहे?

हिस्सार जिल्ह्यामध्ये आदमपूर हा एक असा मतदारसंघ आहे, जिथून माजी मुख्यमंत्री भजन लाल यांच्या कुटुंबीयांनी १९७२ पासून एकदाही पराभव पत्करलेला नाही. भजन लाल, त्यांची पत्नी जस्मा देवी, मुलगा कुलदीप बिष्णोई व नातू भाव्या असे सगळेजण सलग ११ वेळा जिंकून आले आहेत. मात्र, यावेळी पक्षाला मतदारसंघामध्ये स्थानिक पातळीवर पहिल्यांदाच क्षोभाला तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी कुलदीप व भाव्या बिष्णोई यांना कुतियावालीमध्ये गावकऱ्यांशी वाद-विवाद झाला. यावेळी गावकरी व भाजपाचे समर्थक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी जुंपल्याचे बघायला मिळाले. परिस्थिती इतकी चिघळली की पोलिसांना हस्तक्षेप करून भाजपाच्या नेत्यांना सुरक्षितपणे गावाबाहेर न्यावं लागलं. अर्थात, गावकऱ्यांनी आम्हाला विरोध केला नसून विरोधकांचे काही कार्यकर्ते गर्दीमध्ये जमले होते आणि त्यांनी निदर्शने केली अशी सारवासारव कुलदीप बिष्णोई यांनी केली. आदमपूरसह या सगळ्या भागात आम्ही विकासाची किती कामे केली हे सांगत असताना काही मद्यपींनी गोंधळ घातल्याचे बिष्णोई यांचे म्हणणे आहे. संपूर्ण आदमपूर आमच्या कुटुंबाप्रमाणे असून प्रचार व्यवस्थित चालला असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपा नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनीही सांगितले की, कुलदीप व भाव्या लोकांशी संपर्क साधत होते, परंतु काही मद्यपी तरुणांना विरोधकांनी गोंधळ घालण्यास भरीस पाडले. प्रकरण चिघळू नये म्हणून आम्हीच गावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

पवन सैनींना काय सहन करावं लागलं?

अंबाला जिल्ह्यातील नारायणगढमधून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी २०१४ मध्ये निवडून आले होते. तिथे आता पवन सैनी निवडणूक लढवत असून त्यांनाही गावकऱ्यांची निदर्शने बघावी लागली. नारायणगढच्या प्रमुख भागात त्यांना प्रवेशही करू दिला गेला नाही. प्रचारात सहभागी झालेल्या बाकी सर्वांना परतण्यास भाग पाडण्यात आले. शेतकऱ्यांच्या स्थानिक संघटनांनी आंदोलन केले आणि प्रचारफेरीचा रस्ता बंद केला. भाजपा विरोधी घोषणा नी काळ्या झेंड्यांनी निदर्शने झाल्यानंतर सैनींना या भागातून माघार घ्यावी लागली.

धनेश अडलाखा यांचाही ताफा अडवला

फरीदाबाद जिल्ह्यातील बडखलमधले भाजपाचे उमेदवार धनेश अडलखा नवाडा या गावात जात होते. दाबुआ ते नवाडा या वाटेत त्यांचा ताफा अडवण्यात आला. संतापलेल्या निदर्शकांनी मागणी केली की अडलखा यांनी कारमधून उतरावे आणि खड्डेमय रस्त्यांवरून ज्यात संपूर्ण चिखल साठलाय, त्यावरून चालावे. अडलखांना ‘यू टर्न’ घेऊन मागे फिरावे लागले. रविवारी संध्याकाळी भाजपाचे सहा वेळा आमदार झालेले अनिल विज यांना अर्ध्यातून सभा सोडून जावे लागले. भारतीय किसान युनियन (भगत सिंग गट) या संघटनेच्या शेतकऱ्यांनी विज व भाजपा विरोधात घोषणाबाजी केली. हा प्रकार अंबाला कँटोनमेंटमधील शाहपूर गावात घडला. खनोरी येथे पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या भटिंडाट्या शुभकरण सिंह या शेतकऱ्याच्या मृत्यूचा जाब विचारण्यात आला. विज यांच्या समर्थकांचीही निदर्शकांशी बाचाबाची झाली, आणि प्रकरण चिघळतंय हे समजल्यावर विज व त्यांच्या ताफ्यानं काढता पाय घेतला.

क्रिषन बेदींविरोधातही शेतकरी आक्रमक

नरवणा येथून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे माजी मंत्री क्रिषन बेदी यांनाही भिवखेवाला येथे गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांच्या २०२०-२१ च्या आंदोलनाच्या वेळी मौन का राखलं असा प्रश्न गावकऱ्यांनी बेदी यांना विचारला. शेतकऱ्यांचा अनादर करणाऱ्या भाजपाला त्याची फळं भोगावी लागतील असा इशाराच गावकऱ्यांनी दिला.

हिस्सारमधल्या हांसी येथे स्थानिकांनी केलेली निदर्शने सहन न झाल्याने भाजपाचे उमेदवार विनोद भयाना यांचा तोलच सुटला. शुभकरणच्या मृत्यूचा जाब तर विचारलाच शिवाय गावकऱ्यांनी शेतकरी-विरोधी पक्षाचा एक हिस्सा असल्याचा आरोप भयाना यांच्यावर केला. “तुम्हाला मत द्यायचे नसेल, तर नका देऊ, पण वाईट वागू नका,” वैतागलेल्या भयानांनी आपला राग व्यक्त केला.

“ही विरोधी पक्षांची खेळी आहे. ते गर्दीतील मूठभर लोकांना हाताशी धरून आमच्या नेत्यांशी उद्धटपणे वागतात. त्याचा व्हिडीओ बनवतात आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करतात. पण, तळागाळात परिस्थिती वेगळी असून जनता भाजपासोबत आहे आणि निश्चितपणे आम्ही सरकार बनवू,” भाजपा नेत्याने सांगितले. २०१९ मध्ये दुष्यन्त यांना मत दिल्यानंतर त्यांना भाजपाशी हातमिळवणी का केली असा प्रश्न लोकांनी त्यांना विचारला.

माजी उपमुख्यमंत्री आणि ‘जेजेपी’चे नेतेदुष्यन्त चौताला यांनाही उछना कालन या त्यांच्या मतदारसंघातील छटर गावात निदर्शनांना सामोरे जावे लागले. जमावाने दुष्यन्त यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि नंतर त्यांच्या गाडीला सर्व बाजुंनी घेरले. दुष्यन्त यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्यात येत असून त्यांना पुन्हा गावात प्रवेश दिला जाणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला.

हिस्सारमध्ये कुंडलू व प्रभूवाला या गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी भाजपा नेते अनूप धानक यांना लक्ष्य करण्यात आले. धानक हे ‘जेजेपी’चे बंडखोर असून आता उकलाना येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. याआधीही कांदूल, खैरी, कानिला, छान व श्यामसुख या गावांमध्ये धानक यांना निदर्शनांना तोंड द्यावे लागले. या निदर्शनांबाबत विचारले असता, विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंह हुडा म्हणाले, “ही लोकशाही आहे. ही निदर्शने म्हणजे त्यांच्या (भाजपा व जेजेपी) यांच्या अकार्यक्षमतेचा परिणाम आहे.”