भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या विविध भागातील नेत्यांनी गेल्या २ दिवसांपासून हैद्राबाद येथील नोव्होटेल हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एचआयसीसी) येथे तळ ठोकला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेल्य भाजपाच्या नेत्यांची खास बडदास्त ठेवण्यात येत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या नेत्यांसाठी खास तेलंगणाचे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. दोन दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रतिनिधी पंचतारांकित पाहुणचाराचा आनंद घेत आहेत. मात्र यावेळी तेलंगणा भाजपने त्यांना खास तेलंगणाच्या पदार्थांची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. आलेल्या पाहुण्यांना पंचतारांकित मेन्यू न देता राज्यातील मुख्य आचारींनी तयार केलेले खास तेलंगणापद्धतीचे खाद्यपदार्थ देण्याचे ठरवले.

“ आम्ही आमच्या पाहुण्यांना तेलंगणाच्या विविध खाद्यप्रकारांची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतातून आलेल्या पाहुण्यांना तेलंगणाची खाद्यसंस्कृती आणि परंपरा दाखविण्याची हीच योग्य वेळ होती” असे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एन रामचंद्र राव यांनी संगितले. सिद्धीपेट जिल्ह्यातील गुडतीपल्ली गावातील मास्टर शेफ गुल्ला यादम्मा यांच्या नेतृत्वाखाली एचआयसीसी येथे २०० हून अधिक मान्यवरांना अनोख्या पदार्थांची मेजवानी देण्यात येत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे  मुख्यमंतत्री आणि भाजप नेत्यांसाठी तब्बल ५० विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यात आले होते. 

मुख्य जेवणात टोमॅटो-बीन्स करी, आलू कुर्मा, बगरा बैंगन, आयव्ही गार्ड-कोकनट फ्राय, भेंडी-काजू आणि शेंगदाणा फ्राय, रिज गॉर्ड फ्राय विथ मील मेकर फ्लेक्स, मेथी-मूग यांचा समावेश होता. यासोबतच डाळ फ्राय, कैरी डाळ, बिर्याणी, पुलिहोरा, पुदीना भात, दही भात, गोंगुराचे लोणचे, काकडीची चटणी, टोमॅटोची चटणी आणि बाटलीची चटणी तर मिठाईच्या प्रकारामध्ये गुळापासून बनवलेले परवन्नम, शेवया पुडिंग, गोड पुरण पोळी आणि अरिसेलू यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे स्नॅक्समध्ये मूग डाळ, साकीनालू, मक्का गुडालू आणि टोमॅटो, शेंगदाणे, नारळ आणि मिरचीच्या चटण्यांसह विविध चटण्यांसह बनवलेले गारेलू यांचा समावेश होता. या खास तेलंगणा पद्ध्तीच्या मेजवानीची जबादारी प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आणि करीमनगरचे खासदार बंदी संजय यांच्यावर देण्यात आली होती. त्यांनी देशाच्या विविध भागांतून आलेल्या नेत्यांची चव लक्षात घेऊन मेन्यूची काळजी घेतली गेली होती. 

Story img Loader