महेश सरलष्कर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईहून सोमवारी मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारची दुपार उलटून गेली तरी, नवीन महाराष्ट्र सदनाच्या मुख्यमंत्री कक्षामध्ये १२ तास बसून होते. या १२ तासांत भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांना भेटीची वेळही दिली नाही आणि चर्चाही केली नाही. इतकेच नव्हे तर शिंदे गटाच्या बैठकीत सहभागी झालेल्या शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांच्या वेगळ्या गटाला अजून मान्यताही लोकसभाध्यक्षांनी दिलेली नाही.
शिवसेनेच्या संसदीय पक्षात फूट पडली असून १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले असून लोकसभेत वेगळा गट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात १२ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले. या पत्रामध्ये तीन मुद्द्यांचा समावेश असून लोकसभेत शिंदे गटाला मान्यता द्यावी, शिंदे गटाच्या खासदारांची आसनव्यवस्था बदलावी व शिंदे गटाचे नेते म्हणून राहुल शेवाळे यांना मान्यता द्यावी, असे मुद्दे पत्रामध्ये मांडण्यात आले आहेत.
शिवसेनेचे लोकसभेत महाराष्ट्रातून निवडून आलेले १८ तर दिव-दमणमधील पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार असून शिंदे गटामध्ये १२ खासदार सहभागी झाले आहेत. वेगळ्या गटाला मान्यता देण्यासाठी किमान दोन तृतीयांश खासदारांची गरज आहे. किमान १२ खासदारांची शिंदे गटाला आवश्यकता आहे. तुमच्या गटाकडे पुरेसे संख्याबळ आहे का? तसे असेल तर, नेमके संख्याबळ किती हे स्पष्ट करणारे पत्र मुख्य प्रतोद भावना गवळी यांच्या स्वाक्षरीने पुन्हा सादर करा, अशा दोन सूचना बिर्ला यांनी शिंदे गटातील खासदारांच्या शिष्टमंडळाला केल्या. शिंदे गटाने दिलेले पत्र बिर्ला यांनी अधिकृतपणे स्वीकारले नव्हते. त्यामुळे मुख्य प्रतोद म्हणून गवळी यांनी १२ खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र पुन्हा बिर्ला यांना सादर केले. आता या पत्रावर बिर्ला कधी निर्णय घेतात, यावर शिंदे गटाला मान्यता ठरणार आहे. दरम्यान, शिंदे गटातील खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्रात सदनात जाऊन भेट घेतली
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर आणि राजन विचारे असे सहा खासदार आहेत. दिव-दमणमधील शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेल्या कलाबेन डेलकर यांचाही १९ खासदारांमध्ये समावेश होतो. डेलकर यांचा समावेश केला नाही तर शिंदे गटाला १२ खासदारांचे संख्याबळ लागेल अन्यथा आणखी एक वा दोन खासदारांची गरज लागू शकेल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी बोलावलेल्या बैठकीत संजय जाधव उपस्थित होते. शिंदे गटाकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. मात्र, शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
जोपर्यंत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला शिंदे गटातील खासदारांना अधिकृतपणे मान्यता देणार नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीसाठी वेळ देणार नाहीत. त्यामुळे शिंदे दिल्लीत येऊन बारा तास झाले तरी त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह किंवा पंतप्रधान मोदी यांच्यापैकी कोणाचीही भेट घेता आली नाही.
मात्र, शिंदे गटाकडे पुरेसे संख्याबळ असेल, शिवसेनेतील आणखी किमान दोन खासदार बंडखोरी करू शकतात, असा दावा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी केला.