सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : हैदराबाद मुक्ती लढ्यात शहीद झालेले बचित्तर सिंह यांच्या नळदुर्ग येथील दुर्लक्षित स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राजकीय बांधणीस प्रारंभ केला. लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या अंगावर चिरंजीवींनी वाहन घातल्याच्या चर्चेने देशभर वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या मिश्रा यांच्यावर राज्यातील उस्मानाबाद, माढा व सिंधुदूर्ग मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. हैदराबाद मुक्ती लढ्याला रझाकाराविरोधाची पार्श्चभूमी असल्याने त्याचा ध्रुवीकरणाला उपयोग होऊ शकतो, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भाजप नेत्यांनी निजामाची उपमा दिली होती. तर मराठवाड्यात एमआयएमचा काही मतदारसंघात प्रभाव असल्याने बचित्तर सिंह यांचे स्मृतिस्थळ आकर्षक करण्याची तयारी हाती घेण्यात आली आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली या गावातील एका मतदान केंद्राची मिश्रा यांनी पाहणी केली. मतदान केंद्राची जबाबदारी असणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते निवडून आलेल्यांची ताकद कशी व कुठे, जातनिहाय व धर्मनिहाय मतदान तसेच मतदानाचा एकूण कल याचा अभ्यास उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्ण करण्यात आला. या लोकसभा मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार कोण हे अद्यापि ठरले नसले तरी तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव चर्चेत आणले जात आहे. न लढलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघात तसेच एकदाच निवडून आलेल्या मतदारसंघात दौरे आयोजित करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये मिश्रा यांच्याकडे असणाऱ्या अनेक विधानसभा मतदारसंघात यश मिळाले होते. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वेगवेगळी रणनीती अवलंबली जाण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मिश्रा यांनी भाजप नेत्यांची बैठक घेऊन कोणत्या बाबींकडे लक्ष घालावे, याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा… विदर्भात तज्ञ नाहीत का?

हेही वाचा… राजेश टोपेंसमोर आव्हान

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात असून ओम राजेनिंबाळकर प्रतिनिधित्व करत आहेत. भूम-परंडा व उमरगा विधानसभा मतदारसंघ हे भाजप-शिंदे गट युतीकडे आहेत. मतदारसंघातील भाजपची शक्तिस्थळे व कार्यकर्त्यांची बांधणी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, परभणी औरंगाबाद या शिवेसना लढवित असणाऱ्या जागांवर आता भाजपाने तयारी सुरू केली आहे.