भारतातील काही दिग्गज कुस्तीपटूंनी भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली असून काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनीदेखील कुस्तीपटूंना पाठिंबा देत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. याच कारणामुळे ब्रिजभूषण सिंह आगामी काळात लोकसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचे आता ब्रिजभूषण सिंह यांनी थेट उत्तर दिले आहे. मी २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढवणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

मी लोकसभा निवडणूक लढवणार- ब्रिजभूषण सिंह

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून देशभरात महासंपर्क अभियान राबवले जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या काळातील योजना आणि कामांची माहिती नागरिकांना दिली जात आहे. उत्तर प्रदेशच्या सर्व ८० लोकसभा मतदारसंघांत त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघात बिजभूषण यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयातच सभेचे आयोजन करण्यात आले होते. लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मी आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे मी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे, असे ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितले आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी ५ जून रोजी ‘जन चेतना महारॅली’चे आयोजन केले होते. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची चौकशी होणार असल्यामुळे त्यांनी ही रॅली पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

हेही वाचा >> भाजपाच्या २२० महिन्यांच्या सत्तेत २२५ घोटाळे झाले; प्रियंका गांधींची टीका, मध्य प्रदेश निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात

ब्रिजभूषण सिंह यांनी केले काँग्रेसला लक्ष्य

ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या भाषणात कुस्तीपटूंचे आंदोलन तसेच त्यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर थेट भाष्य केले नाही. मात्र त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला एक शेर सांगत या प्रकरणावर अप्रत्यक्षपणे विधान केले. त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. तसेच केंद्रातील विद्यमान भाजपा पुरस्कृत एनडीए सरकारच्या कामगीरीची प्रशंसा केली.

पंडित नेहरुंमुळे भारताला भूभाग गमवावा लागला- ब्रिजभूषण सिंह

त्यांनी सभास्थळी थाटात प्रवेश केला. यावेळी ‘उत्तर प्रदेशचा वाघ ब्रिजभूषण सिंह’ अशा घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. सभेदरम्यान ते स्थानिक आमदारांना छोटेखानी भाषण करण्याचे आवाहन करत होते. तर त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताला आपला अनेक स्वेअर किलोमीटरचा प्रदेश गमवावा लागला. हा भाग पाकिस्तान आणि चीनने बळकावला, अशी टीका त्यांनी केली. तसेच आपल्या भाषणादरम्यान त्यांनी १९७५ ते १९७७ या कालावधित लागू केलेली आणीबाणी तसेच १९८४ च्या दंगलीचाही उल्लेख केला.

हेही वाचा >> ‘मनमोहन सिंह यांचे सरकार दुबळे, मोदी सरकारमध्ये दहशतवादाला आळा’, अमित शाहांचा दावा; म्हणाले “लोकसभा निवडणुकीत…”

सर्व विकासकामांचे श्रेय मोदी यांनाच- ब्रिजभूषण सिंह

आपल्या भाषणात त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपाच जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. भाजपा सरकारने जम्मू काश्मीरमध्ये उत्तम काम केले आहे, असा दावा त्यांनी केला. अयोध्येत बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. या सर्व कामाचे श्रेय मोदी यांनाच जाते. मात्र त्याआधी हे श्रेय भाजपाच्या कार्यकर्त्यांना द्यावे लागेल. कारण कार्यकर्त्यांमुळेच मोदी यांना हे करणे शक्य झाले, असे यावेळी ब्रिजभूषण म्हणाले.

हेही वाचा >> ‘फर्टिलाइजर जिहाद’ संपविण्याची भाजपाची घोषणा; विरोधक म्हणाले, नवे नवे जिहाद काढून मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रकार

अन्य नेत्यांकडून ब्रिजभूषण यांचे तोंडभरून कौतूक

या सभेमध्ये अन्य नेत्यांनीही भाषणं केली. मात्र बहुतांश नेत्यांनी ब्रिजभूषण सिंह यांचे कौतुकच केले. आमदार अंजू सिंह यांनी ब्रिजभूषण सिंह हे पूर्वांचल भागाचे भूषण आहेत. तरुणांचे ते प्रेरणास्थान आहेत असे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशचे मंत्री मोहन यादव यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी जमलेल्या श्रोत्यांना ब्रिजभूषण सिंह यांच्यासाठी टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. ब्रिजभूषण यांनी आतापर्यंत ५५ महाविद्यालये आणि शाळांची उभारणी केली आहे. त्यांनी या भागात शिक्षणाच्या प्रचार-प्रसाराचे काम केले आहे, असे म्हणत तोंडभरून कौतुक केले.

Story img Loader