Fatehpur Sikri Loksabha लोकसभा निवडणुकीतील पहिल्या चरणाचे मतदान उद्या पार पडणार आहे. मात्र, अद्याप जागावाटपावरून पक्षांतर्गत वाद सुरूच आहे. जगावाटपाच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश भाजपा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. भारतीय जनता पार्टीला (भाजपा) फतेहपूर सिकरी लोकसभा मतदारसंघालोकसभा मतदारसंघात अनपेक्षित अडचणीचा सामना करावा लागत आहे. भाजपाचे स्थानिक आमदार बाबूलाल चौधरी यांनी पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजकुमार चहर यांच्या विरोधात आपल्या मुलाला उभे करून बंडाची हाक दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोण आहेत बाबूलाल चौधरी?
२०१४ ते २०१९ पर्यंत भाजपाचे खासदार असलेले बाबूलाल चौधरी यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले होते. बाबूलाल यांचे पुत्र रामेश्वर चौधरी यांनी सोमवारी (१५ एप्रिल) फतेहपूर सिकरी या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपासमोर नवे आव्हान उभे केले आहे. बाबूलाल चौधरी हे जाट समाजातील आहेत. भाजपामध्ये येण्यापूर्वी ते राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) बरोबर होते. त्यांनी मुलाच्या उमेदवारीबद्दल बोलताना सांगितले की, त्यांचा मुलगा लोकांचा उमेदवार आहे आणि पंचायतीमध्ये त्याला उमेदवारी मिळावी हा निर्णय झाला आहे. त्यांनी असा दावा केला की, स्थानिक लोक पक्षाच्या अधिकृत उमेदवार राजकुमार यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाला प्राधान्य देतात. विद्यमान खासदारांच्या परिसरातील अनुपस्थितीबाबत आणि स्थानिक समस्यांबाबत परिचित नसल्याने स्थानिक चिंतेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी
आमदार निर्णयावर ठाम
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आमदार आणि त्यांच्या मुलाला समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते काहीही ऐकायला तयार नाहीत. भाजपाचे आग्रा जिल्हाध्यक्ष गिरीराज कुशवाह म्हणाले की, त्यांनी मुलाची उमेदवारी मागे घेण्यासाठी आमदार बाबूलाल यांचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी ही बाब पक्ष वरिष्ठांना सांगितली आहे. तेच यावर योग्य तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. राजकुमार चहर हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असून ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कुशवाह यांनी सांगितले.
रामेश्वर चौधरी यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये आग्रा आणि मथुरा येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. तीन वेळा आमदार आणि एक वेळचे खासदार असलेले बाबूलाल चौधरी यांनी १९९६ मध्ये अपक्ष म्हणून पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी लोकदलाचे उमेदवार म्हणून दुसरी विधानसभा निवडणूक जिंकली, तर तिसरी विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाच्या चिन्हावर जिंकली.
रामेश्वर चौधरी यांनी विद्यमान खासदारांच्या कार्यकाळावर आणि त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. रामेश्वर यांनी गेल्या दशकभरातील आपली कामगिरी अधोरेखित केली आणि विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षांत काहीही काम न केल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली. “गेल्या १० वर्षांपासून मी लोकांसाठी काम करत आहे. लोकांच्या सुख-दु:खात मी त्यांच्याबरोबर राहिलो आहे, तर मी का लढू शकत नाही? असा प्रश्न रामेश्वर यांनी केला.
हेही वाचा : नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?
फतेहपूर सिकरी लोकसभा मतदारसंघ
१८ लाख मतदार असलेल्या फतेहपूर सिकरी लोकसभा मतदारसंघात जाट समाजाचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात ३ लाख मतदार जाट समुदायाचे आहेत. फतेहपूर सिकरी, फतेहाबाद, खेरागड, आग्रा ग्रामीण आणि बाह या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या जागेवर तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होत आहे. या जागेवरून उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकुमार चहर ६६.२४ टक्क्यांसह ६,६७,१४७ मतांनी विजयी झाले होते. दुसर्या क्रमांकावर असणारे काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांना १,७२,०८२ मते मिळाली होती.