पुणे : भाजपच्या राज्यातील ‘हेडमास्तर‘ने पुण्यातील आमदारांच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’ मागवले असल्याने नापासाचा शिक्का बसल्यास उमेदवारी जाण्याच्या धास्तीने कामकाजाची गोळाबेरीज करण्यासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला वाटेकरी करून घ्यावे लागणार आहे. अजित पवार गटाकडून वडगाव शेरी, हडपसर या मतदार संघांबरोबरच खडकवासला या विधानसभा मतदारसंघावरही दावा केला जाण्याची शक्यता असल्याने ‘रिपाेर्ट कार्ड’वर भाजपच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे विद्यमान आमदारांपैकी कोणाला घरची वाट दाखवायची, हे ‘रिपोर्ट कार्ड’वर ठरणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये असणार आहे. भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या असल्याने पाच वर्षांतील कामगिरीमध्ये नापासाचा शिक्का बसल्यास उमेदवारी जाण्याच्या धास्तीने आमदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
Shoe necklace to BJP MLA Krishna Gajbe image due to Zendepar iron mine issue
भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला
Thane district Pipani trumpet election symbol NCP Sharad Pawar
ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात ‘वंचित’ची वीण अधिक घट्ट

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात, तर दोन मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहेत. एक मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. कोथरूडमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघात भीमराव तापकीर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे हे भाजपचे पाच आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत.

वडगाव शेरी, हडपसर कळीचे मतदारसंघ

वडगाव शेरी आणि हडपसर हे दोन्ही मतदारसंघ भाजप आणि अजित पवार गटाच्यादृष्टीने कळीचे मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत वडगावशेरीमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक आणि हडपसरमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर या दोघांचा पराभव झाला होता. त्यामुळे जागावाटपात या दोन्ही जागांसाठी भाजपकडून आग्रह धरला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मुळीक आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यात लढत झाली होती. टिंगरे यांनी केलेला पराभव मुळीक यांच्या जिव्हारी लागला होता. या निवडणुकीत त्यांच्याकडून उमेदवारी मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादृष्टीने त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांशी संपर्क वाढविला आहे.

हेही वाचा – काँग्रेसचा वर्धापनदिन नागपूरमध्येच का ?

हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे यांनी योगेश टिळेकर यांचा अवघ्या २८२० मतांनी पराभव केला होता. त्यामुळे टिळेकर हेदेखील उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, शरद पवार समर्थक प्रशांत जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्यास तुपे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

खडकवासलावर राष्ट्रवादीचा दावा?

वडगाव शेरी आणि हडपसर या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ सोडण्याची वेळ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खडकवासला विधानसभा मतदारसंघ मिळण्यासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी ‘हॅटट्रीक’ साधली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा अवघ्या २५९५ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून या जागेवर हक्क सांगितला जाऊ शकतो. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे.