BJP MLA Munirathna Naidu : कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगरमधील भारतीय जतना पक्षाचे आमदार मुनिरत्ना नायडू हे आणखी एका वादात सापडले आहेत. खरं तर आमदार मुनिरत्ना नायडू हे कोणत्या न कोणत्या विषयांवरून कायम चर्चेत असतात. आता मुनिरत्ना नायडू यांनी अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी आणि कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. मुनिरत्ना नायडू यांना या प्रकरणात बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर न्यायालयाने मुनिरत्ना यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली.
दरम्यान, मार्च २०२३ मध्ये पोलिसांनी मुनिरत्ना नायडू यांच्यावर ख्रिश्चनांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सर्वात आधी राजराजेश्वरी नगरमधील काँग्रेसच्या कुसुमा एच यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुढच्याच महिन्यात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी भाजपा सरकार असताना फलोत्पादन मंत्री राहिलेल्या नायडू यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करणाऱ्या एका पत्राने त्यांच्या आणि कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेतील वादाचा नवा अध्याय सुरु झाला होता. त्याच वर्षी पुढे असोसिएशनचे अध्यक्ष डी केम्पण्णा आणि इतर चार पदाधिकाऱ्यांना मुनीरथना यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात अटक करण्यात आली. मुनीरथना यांचे नाव न घेता केम्पण्णा यांनी म्हटलं होतं की, “मंत्री अधिकाऱ्यांना पैसे उकळण्याची धमकी देत आहेत.”
दरम्यान, मुनिरत्ना नायडू यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात उत्तर बेंगळुरूमधील यशवंतपूर येथून नगरसेवक म्हणून केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर राजराजेश्वरीनगर मतदारसंघात त्यांचं वर्चस्व राहिलं. मुनिरत्ना नायडू हे दोनदा २०१३ आणि २०१८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर एका वर्षानंतर भाजपाचे उमेदवार म्हणून पोटनिवडणूक जिंकली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना फलोत्पादन मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.
त्यानंतर २०१९ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने बेंगळुरू महानगरपालिकेमधील बनावट बिल घोटाळ्याच्या संदर्भात ५८ वर्षीय चित्रपट निर्माते आणि कंत्राटदारातून राजकारणात आलेल्या काहीचे नाव दिले होते. दरम्यान, हा घोटाळा राजराजेश्वरीनगर मल्लेश्वरम आणि गांधीनगर मतदारसंघात १,५०० कोटी रुपयांच्या नागरी कामांच्या अंमलबजावणीशी संबंधित होता. काही प्रकरणांमध्ये एकाच कामासाठी एकापेक्षा जास्त वेळा बिले देण्यात आली होती. तर काही ठिकाणी सुरूही न झालेल्या प्रकल्पांसाठी दावे करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी आमदार असलेले मुनिरत्ना नायडू यांनाही आरोपपत्रात आरोपी करण्यात आलं होतं.
हेही वाचा : Row Over Marathwada Package : मराठवाडा पॅकेजमधील योजनांच्या अंमलबजावणीवरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी
तसेच २०१८ मधील आणखी एक प्रमुख प्रकरण जिथे मुनिरत्ना स्वत:ला अडकवले गेले. ते म्हणजे जलहल्ली येथील एका अपार्टमेंटमधून सुमारे ९,८०० मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात मुनिरत्ना आणि अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०२० मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या संबंधात दाखल केलेल्या आरोपपत्रांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश एका जनहित याचिकेच्या उत्तरात दिले होते. मुनिरत्ना हे बेंगळुरू शहरातील कंत्राटदारांशी जोडलेले असल्याचे मानले जाते. जे शहरातील विविध प्रकल्पांवर नियंत्रण ठेवतात आणि रामलिंगा रेड्डी आणि डीके शिवकुमार यांसारख्या काँग्रेस नेत्यांशी चांगले संबंध ठेवून असल्याचेही बोलले जाते.
दरम्यान, ते माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी त्यांचा मुलगा आणि अभिनेता-राजकारणी निखिल कुमारस्वामी यांचा समावेश असलेला चित्रपट तयार केला होता. त्याने रजनीकांतचा ब्लॉकबस्टर चित्रपट लिंगा देखील तयार केला होता. १ जून २०१० रोजी मध्य बेंगळुरूमध्ये बीबीएमपी भिंत कोसळण्याच्या प्रकरणाशी संबंधित कंत्राटदार म्हणून मुनिरत्ना देखील अडचणीत आले होते. भिंत कोसळण्याच्या प्रकरणाक १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता.