हिंगोली: हिंगोली विधानसभा मतदारंघातून भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह त्यांचे चिरंजीव शिवाजी यांचेही नाव टाकण्यात आले आहे. अन्य उमेदवारांची संख्या वाढल्याने आमदार मुटकुळे यांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघातून सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील सुमठानकर , डॉक्टर विठ्ठल रोडगे यांनीही दावा करुन जनसंपर्क वाढवला आहे.

गेल्या दहा वर्षापासून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे विधानसभेचे नेतृत्व करीत आहेत. पण त्यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे हे सुद्धा निवडणूक लढविण्यासाठी हट्ट करत असल्याची चर्चा आहे. उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. रामदास पाटील सुमठानकर हे खरे तर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागले होते. त्यांनी लोकसभेचे उमेदवारी दाखल केल्यानंतर ती परत घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागली होती. तेही विधानसभेसाठी प्रयत्न करत आहेत. तीन महिन्या पासून भारतीय जनता पक्षाच्या विविध योजना मतदारांसमोर ठेवण्यासाठी प्रचार रथाच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत. डॉ. विठ्ठल रोडगे यांनीसुद्धा ग्रामीण भागात फिरून मतदारांशी संपर्क वाढवला आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”

हेही वाचा >>>Haryana Assembly Election 2024 Result: हरियाणामध्ये काँग्रेसचं काय चुकलं? ही आहेत पराभवाची ५ कारणं

भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याऐवजी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून तीन उमेदवाराची नावे आपल्या पसंती बंद लिफाफ्यात सूचविण्याच्या प्रयोग हिंगोली जिल्ह्यातही पार पडला. बंद लिफाफ्यात विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे, त्यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे,रामदास पाटील सुमठाणकर,डॉक्टर विठ्ठल रोडगे, माजी आमदार गजानन घुगे, माजी खासदार शिवाजीराव माने, पक्षाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार रामराव वडकुते,अँड. प्रभाकर भाकरे अशी नावे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमदार मुटकुळे यांची डोकेदुखी वाढली.

Story img Loader