परभणी : गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोन्ही मित्र पक्षातील बेबनाव गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे काम आम्ही करणार नाही अन्यथा आम्हाला पक्षातून मोकळे करा अशी भूमिका या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. नुकतीच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या शिष्टमंडळाने भेट घेतली. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत ही जागा भाजपनेच लढवावी असे साकडे या कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाकडे घातले तथापि पक्षनेतृत्वाने ही भावना अधिक गांभीर्याने न घेतल्याने या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विठ्ठलराव रबदडे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे, ॲड. व्यंकटराव तांदळे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम मुंढे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गंगाखेड, पालम, पूर्णा या तिन्ही तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्ते या शिष्टमंडळात होते. गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत मात्र भाजपच्या बहुतांश स्थानिक पदाधिकाऱ्यांचे गुट्टे यांच्याशी सख्य नाही. प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य म्हणून पक्षात आधीच स्थान मिळवलेल्या संतोष मुरकुटे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.मात्र मुरकुटे आणि गुट्टे यांच्यात राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून आहे. लोकप्रतिनिधी आहात तर तसेच जबाबदारीने वागा असे सुनावतानाच यापुढे तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मुरकुटे यांनी गुट्टे यांना एका जाहीर कार्यक्रमातून दिला होता. भाजप आणि रासप हे महायुतीतील मित्रपक्ष असले तरी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात हे दोन्ही पक्ष मात्र आमने-सामने आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप

आणखी वाचा-भाजप-शिंदे गटात चढाओढ; रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा जोरदार प्रचार

मुरकुटे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी पार पडला त्याला तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड या दोघांनीही उपस्थिती लावली होती. या दोन्ही नेत्यांनी गंगाखेडची जागा भारतीय जनता पक्षाला सोडवून घेण्याचा शब्द तर मुरकुटे यांना दिलाच पण त्यांना ‘कामाला लागा’ असा संदेश देत या मतदारसंघात उद्याचा आमदार हा भाजपचा असेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पुन्हा जेव्हा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना गंगाखेडबाबत माध्यमांनी विचारले तेव्हा त्यांनी गुट्टे यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यानंतरही भारतीय जनता पक्ष व रासप यांच्यात अनेकदा संघर्षाचे खटके उडाले. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुट्टे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत असहकाराची भूमिका घेतली आहे.

आणखी वाचा-Champai Soren : झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का? माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर?

गंगाखेडची जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या तावडीतून सोडवून घेऊन भाजपने लढवावी. सर्वार्थाने सक्षम असणारे तसेच जातीय समीकरणात प्रभावी ठरणारे उमेदवार या मतदारसंघात भाजपकडे आहेत. असे असतानाही रासपचे काम आम्ही कशासाठी करायचे ? जर आमच्या भावना पक्षनेतृत्वाने समजून घेतल्या नाहीत तर आम्हाला पक्षकार्यातून मोकळे करा.. प्रदेशाध्यक्षांनी यासंदर्भात रास्त निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत करणार नाहीत. -विठ्ठलराव रबदडे, माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप.