उमाकांत देशपांडे लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : भाजपकडून उत्तर भारतीयांसाठी आता अधिक श्रावणमासानिमित्ताने शिवआराधना केली जाणार आहे. चुनाभट्टी येथील पुरातन शिवमंदिरात सोमवारी शिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुंबई भाजप अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांच्यासह अनेक आमदार त्यास उपस्थित होते. तर महिलावर्गाला खूष करण्यासाठी श्रावणात मंगळागौरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पहिले पारितोषिक तब्बल साडेतीन लाख रुपयांचे आहे.

हेही वाचा >>> नवाब मलिक अजित पवारांबरोबर आल्यास भाजपची राजकीय कोंडी?

भाजपने गेली अनेक वर्षे अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा लावून धरला, अनेक आंदोलने केली आणि आता हे मंदीर उभारले जात आहे. भाजपसाठी आगामी निवडणुकांमध्ये उत्तर भारतीयांची मते महत्वाची आहेत. त्यामुळे छठपूजेसह अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम भाजप आणि उत्तर भारतीय मोर्चातर्फे आयोजित केले जातात. उत्तर भारतीयांसाठी भगवान शंकराच्या उपासनेचेही मोठे महत्व असल्याने चुनाभट्टी शिवमंदिरात महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शेलार यांच्याबरोबरच आमदार प्रसाद लाड, कँप्टन तमिळ सेल्वन, कालिदास कोळंबकर यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची त्यास उपस्थिती आहे.

हेही वाचा >>> राज्यात काँग्रेसची पुन्हा यात्रा

गणेशोत्सव, दहीहंडी, दिवाळीपहाट, दिवाळी आणि गुढीपाडवा शोभायात्रा, नवरात्री आदींचे आयोजन मुंबई भाजप किंवा आमदार-खासदारांकडून केले जाते. यंदा अधिक महिन्याची भर असल्याने शिवआराधनेसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महिलावर्गाला खूष करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शेलार यांनी यंदा मंगळागौर स्पर्थेची घोषणा नुकतीच केली असून त्यात सहभाग घेण्यासाठी सोळा ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यामुळे श्रावणात मंगळागौरी यंदा अधिक दणक्यात आणि राजकीय ने त्यांच्या सहभागात मुंबईत साजऱ्या होणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp organizes shiv shiv mahotsav mangalagaur competitions for women in shravan print politics new zws
Show comments