संतोष मासोळे

धुळे: विधानसभा निवडणुकीला दोन वर्षांपेक्षा अधिकचा अवकाश असताना धुळे महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळविणाऱ्या भाजपने आतापासूनच काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचा धुळे ग्रामीण मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडेही त्यादृष्टीनेच पाहिले गेले. परंतु, विधानसभेसाठी संभाव्य इच्छुकांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल की नाही, याविषयी साशंकता असताना उमेदवारी हमखास आपणासच मिळेल, या आशेने काही जणांनी तयारीही सुरू केली आहे.

present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचा राजकीय प्रभाव असलेला धुळे तालुका आणि एमआयएमचे आमदार असलेले डाॅ. फारुक शहा यांचा थोडाफार प्रभाव असलेले धुळे शहर वगळता जिल्ह्यात सर्वत्र भाजपचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील बहुतेक भागांतील लहान-मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्था भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपने धुळे ग्रामीण मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उमेद- वारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक वाढून बंडखोरीचा धोका टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन भाजपकडून आतापासूनच करण्यात येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निमित्त साधून शिवसेनेच्या ठाकरे गटात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात आलेले यश असो, किंवा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रा.अरविंद जाधव यांच्या सूनबाई अश्विनी पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी झालेली निवड असो. हा या नियोजनाचाच भाग मानला जात आहे.

हेही वाचा : परभणीत लोकसभेला भाजप-शिवसेना ‘सामना’?; मेघना बोर्डीकर यांचे दौरे सुरू

राज्यात सध्या सुरू असलेल्या शिवसेनेतील फाटाफुटीला धुळे जिल्ह्यातही भाजपने बळ दिले आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड गटाचे प्रभावी नेते बाळासाहेब भदाणे यांना गळाला लावून त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटापासून पद्धतशीरपणे दूर करण्यात आले. भदाणे यांच्या पत्नी शालिनी भदाणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून भाजपला थेट मदत केली. त्याच वेळी धुळे पंचायत समितीत बोरकुंड गटातील ठाकरे गटाचे सदस्य आणि इतर तीन अशा चार सदस्यांना घेऊन भदाणे यांनी थेट भाजपशी हातमिळवणी केली. या खेळीमुळे धुळे तालुक्यात ठाकरे गट कमकुवत होऊन त्याचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही झाला आहे.

हेही वाचा… फेसबुक खरंच ‘अतिरेकी’ आहे का?

धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व असून माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील हे आमदार आहेत. त्याआधी रोहिदास पाटील यांचा शिवसेनेने या विधानसभा मतदार संघात पराभव केला होता. शिवसेनेकडून प्रा.शरद पाटील यांनी विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला होता. यामुळे भाजपनेही या ठिकाणी मागील निवडणुकीत नशीब अजमावून पाहिले होते. मात्र यश आले नाही. प्रा.अरविंद जाधव हे त्यावेळी माजी आमदार शरद पाटील यांच्यासोबतच शिवसेनेत होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रा. जाधव यांच्या सुनेला अध्यक्षपद देऊन ग्रामीण भागात पक्षाला बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. प्रा. जाधव हे धुळे ग्रामीणमध्ये भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीतील एक नाव आहे.

हेही वाचा : सांगोला सूत गिरणी निवडणुकीत शेकापचे भवितव्य ठरणार; शहाजीबापू पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष देवरे हे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे मामा आहेत. मामा-भाचे अशा नात्यामुळे देवरे हे कुणाल पाटलांच्या विरोधात आपली ताकत उभी करू शकत नसल्याचा अनुभव मागील विधानसभा निवडणुकीत आला आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांचे पुत्र राम भदाणे हे जिल्हा परिषदेचे सदस्य असले तरी आ. कुणाल पाटील यांच्यापेक्षा अधिक वरचढ ठरू शकत नाहीत. त्यामुळेच धुळे ग्रामीणचा अभ्यास असणारे आणि गावागावात संपर्क असलेल्या उमेदवाराच्या शोधात भाजप असून ऐनवेळी भाजप धक्कातंत्राचा वापर करीत असल्याने इच्छुकांमध्येही सावधगिरी बाळगण्यात येत आहे.