छत्रपती संभाजीनगर : आरक्षण आंदोलनामुळे भाजपच्या मतावर काही ना काही नकरात्मक परिणाम होऊ शकतात, याची कल्पना असल्याने महिला मतपेढीतून ती मते भरुन काढण्याची तयारी सुरू करा, अशा आशयाच्या सूचना भाजपच्या नेत्यांनी मराठ्यातील भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून दिल्या. पुढील काळात लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे तीन हजार मेळावे घेण्याचे उद्दिष्ट भाजपने ठरिवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या योजनेतील रकमेचा जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका क्षेत्रातील या मेळाव्यातून लाभार्थ्यांचे सत्कार करा अशा सूचना देण्यात आल्या असून हा कार्यक्रम शासकीय असेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

हे ही वाचा…मराठवाड्यात भाजपसमोर आव्हान कायम

लोकभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर केवळ ३६ मते वाढली तरी भाजप निवडून येईल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. या योजनेचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणातून केला. ते म्हणाले, सध्या एक कोटी ६० लाख महिलांना प्रतिमाह १५०० रुपये दिले जात आहेत. लाभार्थींची ही संख्या २.५० कोटींपर्यंत वाढवत न्यायची आहे. महिलांमध्ये जाती धर्माच्या पुढे जाऊन मतदान करण्याची तयारी दिसते आहे. महिलांमध्ये सकारात्मकता आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर ३६ नाही तर त्यापेक्षा जास्त मते लाडक्या बहिणींच वाढवून देतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हे ही वाचा…पुण्यात ठाकरे गटामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

लोकसभा निवडणुकीतील नकरात्मकता घालविणारी योजना म्हणून सत्ताधाऱ्यांनी महिला मतपेढीवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय दसऱ्यापासून दिवाळीच्या धनत्रयोदशीपर्यंत मोटार सायकल रॅली, लाभार्थींच्या गाठीभेटी असे अनेक कार्यक्रम भाजप कार्यकर्त्यांना नेते अमित शहा यांनी दिले

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp plans to arrange three thousand ladki bahin yojana beneficiaries melava to attract woman vote bank print politics news sud 02