अकोला : अकोला पश्चिम मतदारसंघात बंडखोरी थोपवण्यात भाजप नेतृत्वाला अपयश आले. प्रभावी बंडखोरांमुळे हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण होणार असून भाजपची मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे. अकोला पश्चिमचा बालेकिल्ला राखण्याचे कडवे आव्हान भाजपपुढे निर्माण झाले. समीकरण जुळवण्यात भाजप नेतृत्वाची चांगलीच दमछाक होणार आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांनी भाजपचा झेंडा फडकवत ठेवला. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचे भाजपपुढे प्रमुख लक्ष्य आहे.

Shivena Shinde group, rebel in ncp Sharad Pawar,
भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
BJP MLA preparing for rebellion Supporters are invited to fill the application form Wardha
भाजप आमदार बंडखोरीच्या तयारीत? अर्ज भरण्यास दिले समर्थकांना निमंत्रण
BJP, Vidarbha, assembly election 2024
भाजप विदर्भातील आणखी तीन विद्यमान आमदारांना डच्चू देणार
aditya Thackeray allegation eknath shinde
भाजपविरोधात बंडखोरांना शिंदेंकडून आर्थिक रसद; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
assembly elections in Satara the BJP won four seats from the Mahayuti the Sena and the Rashtravadi two seats
साताऱ्यात महायुतीकडून भाजपला चार तर सेना, राष्ट्रावादीला दोन जागा; भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची माहिती
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
bjp leader dilip bhoir
अलिबागमधून भाजपचे दिलीप भोईर बंडखोरीच्या तयारीत

हेही वाचा – उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला

भाजप नेतृत्व शर्मा कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी देणार, हा कळीचा मुद्दा असताना माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवला. येथे लढण्यासाठी स्व. गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा यांच्यासह २२ जण इच्छुक होते. विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षात मोठी बंडखोरी झाली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून दंड थोपाटले. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा देखील अपक्ष निवडणूक लढत आहेत. यासर्व उमेदवारांच्या बंडखोरीमुळे हिंदुत्ववादी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. त्यामुळे भाजपचे गठ्ठा मतदान फुटण्याची दाट शक्यता आहे. पक्षाचा जनाधार कायम राखण्यासाठी भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

विजयाची ‘डबल हॅट्ट्रिक’ साध्य करणाऱ्या दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी कडवी झुंज दिली होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत स्व. गोवर्धन शर्मा यांचा दोन हजार ३६९ मतांनी निसटता विजय झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येसुद्धा भाजपची पीछेहाट झाली. काँग्रेसला भाजपपेक्षा १२ हजार ०७१ मते अधिक पडली. आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून साजिद खान पठाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन यांनी वंचितच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल करूनही अखेर माघार घेतली. वंचित आघाडीसह भाजपसाठी देखील हा मोठा धक्का मानला जात आहे. बंडखोरी शमवण्यात काँग्रेसला यश आले, दुसरीकडे भाजपसमोर बंडखोरांची डोकेदुखी आहे. भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत थेट, दोन जागी ‘बहुरंगी’ लढत

निवडणुकीला धार्मिक रंग

अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. जातीय समीकरण देखील मतदारसंघात महत्त्वपूर्ण ठरते. अकोल्यातील जुने शहर भागात अनेक वेळा जातीय दंगली उसळल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा मुस्लीम उमेदवार दिला. वंचितनेसुद्धा काँग्रेसमधील मुस्लीम नेत्याला संधी दिली होती. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने मुस्लीम मतांची विभागणी टळली. विशिष्ट ‘फतवे’ निघाल्याची चर्चा प्रचारात केंद्रस्थानी आहे. भाजपसह इतर उमेदवारांकडून हिंदुत्वाचा मुद्दा समोर केला. अकोला पश्चिममध्ये निवडणुकीला धार्मिक रंग चढले आहेत.