Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : भाजपने उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर हे पिछाडीवर असून, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी हे आघाडीवर आहेत. भाजपने माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना उमेदवारी नाकारली होती. दोघांनी बंडखोरी करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यापैकी धारवाड-मध्य मतदारसंघात शेटर हे १८ हजार मतांनी पिछाडीवर होते. तर माजी उपमुख्यमंत्री सावदी हे सीमा भागातील अथनी मतदारसंघात सुमारे २८ हजार मतांनी आघाडीवर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा… Karnataka Election Results 2023 Live : “‘या’ एका घोषणेने कर्नाटकात भाजपाचा पराभव”, सचिन पायलट यांनी सांगितलं काँग्रेसच्या विजयाचं कारण

राज्य काँग्रेसचे प्रभारी आघाडीवर तर भाजपचे पिछाडीवर

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे गडग मतदारसंघातून ५०० पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर होते. त्याच वेळी राज्य भाजपचे प्रभारी सी. टी. रवी हे चिकमंगळूर मतदारसंघातून सुमारे हजार मतांनी पिछाडीवर होते.