BJP RSS Preparation started for Local Body Election : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपासाठी मोर्चेबांधणी करण्यास सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती. यावेळी आरएसएसने युतीसाठी काम केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र बहुरंगी असतील. यावेळी संघ केवळ भाजपासाठी काम करताना दिसेल. युती व आघाडीमधील अनेक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मविआमध्ये शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस वेगवेगळे लढणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच चित्र महायुतीत देखील पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने भाजपाने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यात आता त्यांना संघाचाही हातभार मिळणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.

भाजपाने आरएसएसच्या माध्यमातून त्यांच्या आघाडीच्या सर्व संघटनांमध्ये समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. सर्व माध्यमं, संघटना सक्रीय केल्या आहेत. नुकतीच यासंदर्भात भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. संघ व त्यांच्याशी संबंधित संघटना, प्रामुख्याने हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर एका कार्यकर्त्याने सांगितले की भाजपा व संघाने एकत्र काम केल्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला मोठं यश मिळालं. त्यामुळे असाच समन्वय पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठेवावा लागणार आहे. कोणतेही वाद किंवा मतभेद निवडणुकीच्या दृष्टीने संघटनेला परवडणारे नाहीत असा थेट संदेश नेतृत्वाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे.

All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Maharashtra Corporation Election
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली!
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हे ही वाचा >> Bharat Gogawale : “…अन्यथा आमच्या सरकारवर ठपका पडेल”, मंत्री भरत गोगावलेंचं बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावरून मोठं विधान

२७ महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत

अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की “आमचं सरकार राज्यात लवकारत लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करत आहे”. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिकांचा कारभार सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे. राज्यात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेसह एकूण २७ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासह इचलकरंजी व जालन्यात दोन नव्याने महामंडळं स्थापन झाली आहेत, ती देखील पहिल्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत.

हे ही वाचा >> Anjali Damania : “मी गणपतीची शपथ घेऊन सांगते, धनंजय मुंंडेंचं राजकारण संपवण्यासाठी…”, बीड प्रकरणात अंजली दमानियांचा दावा

विधानसभेतील विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास बळावला

स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच्या महायुतीच्या (एकनाथ शिंदे) सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत असा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे. विरोधक आजही निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. शिवसेनेने (ठाकरे) सातत्याने दावा केला आहे की भाजपा व शिवसेना (शिंदे) मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. राज्यातील महापालिका आपल्या हातून निसटतील याची त्यांना भिती आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यांच्याकडून तयारी सुरू झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

हे ही वाचा >> Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं

मित्रपक्षांबाबत भूमिका काय?

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयी दी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्च किंवा एप्रिल महिन्यात होण्याची अपेक्षा आहे”. तर, या निवडणुकीतील आरएसएसच्या सहभागाबद्दल ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत संघ व संबंधित ३५ आघाडीच्या संघटनांची भूमिका महत्त्वाची होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपा, आरएसएस व त्यांच्या सर्व आघाडीच्या संघटनांबरोबर मिळून काम करतील. संघ व त्यांच्याशी संबंधित संघटनांचा आम्हाला सक्रीय पाठिंबा मिळेल. महाराष्ट्रातील २८८ पैकी १५८ जागा लढवणाऱ्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक घटकांबरोबर युती करणार नाही”.

Story img Loader