BJP RSS Preparation started for Local Body Election : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपासाठी मोर्चेबांधणी करण्यास सज्ज झाला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होती. यावेळी आरएसएसने युतीसाठी काम केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र बहुरंगी असतील. यावेळी संघ केवळ भाजपासाठी काम करताना दिसेल. युती व आघाडीमधील अनेक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मविआमध्ये शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस वेगवेगळे लढणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच चित्र महायुतीत देखील पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने भाजपाने अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यात आता त्यांना संघाचाही हातभार मिळणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा