संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी रविवारी (११ ऑगस्ट) भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये संघ-भाजपामधील ताणलेल्या संबंधांची चर्चा महत्त्वाची ठरली. त्याशिवाय आगामी काळात काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि बांगलादेशातील अराजकावरदेखील चर्चा करण्यात आली आहे. मात्र, अधिकृत सूत्रांनी ही ‘नियमित बैठक’ असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने अपेक्षित कामगिरी केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या कानपिचक्या आणि संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ मासिकातून केलेली टीका यांमुळे संघ आणि भाजपामधील सहसंबंध दुरावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक फारच महत्त्वाची मानली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा