उमेदवारी यादीत पक्षांना ‘नऊ’ आकड्याची भुरळ

मुहूर्त पाहून शुभ कार्य करण्यात आणि मुहूर्त नसताना ते टाळण्यात राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आघाडीवर असतात.

bjp shivsena 9 number
उमेदवारी यादीत पक्षांना ‘नऊ’ आकड्याची भुरळ (संग्रहित छायाचित्र)

ठाणे: मुहूर्त पाहून शुभ कार्य करण्यात आणि मुहूर्त नसताना ते टाळण्यात राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आघाडीवर असतात. हाच योग यंदा विधानसभेच्या निमित्ताने भाजप, मनसे आणि शिवसेनेने साधलेला दिसतो आहे. भाजपने महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत ९९ जणांना स्थान दिले. याचा शुभ आकडा नऊ येतो. मनसे आणि शिवसेनेने मंगळवारी आपल्या प्रत्येकी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. याचा शुभ अंकही ९ येतो. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी उमेदवारी यादीच्या निमित्ताने नऊचा योग साधल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते अनेक धार्मिक मान्यता पाळतात. शुभ काम करण्यापूर्वी मुहूर्त पाळण्याचे अनेक प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आले आहेत. अनेकदा महाराष्ट्रातील विविध निवडणुका या पितृपक्ष काळात आल्या. अशा वेळेस अर्ज भरण्याचेही उमेदवारांनी टाळले होते.

uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Kavathe Mahankal Assembly constituency
अजित पवारांच्या खेळीमुळे आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटलांसमोर तगडे आव्हान
Ladki Bahin Yojana Suspend
Ladki Bahin Yojana : निवडणूक आयोगाचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारला महत्त्वाचे निर्देश!
Vijay Shivtare Told The Reason About Sunetra Pawar Defeat in Loksabha Election
Vijay Shivtare : बारामतीत सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक का हरल्या? चार महिन्यांनी विजय शिवतारेंनी नेमकं काय सांगितलं?
Baba Siddique Links With Dawood What Nana Patole says
‘बाबा सिद्दिकी यांचे दाऊदशी संबंध’, लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक दावे; तर नाना पटोले म्हणतात, ‘दाल मे कुछ काला’
Baba Siddique NCP leader shot dead in Bandra by unidentified assailants
Baba Siddique : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, गोळीबार नेमका कसा झाला? वांद्र्याच्या सिग्नलवर नेमकं काय घडलं?
Amit thackeray and AAditya thackeray
Amit Thackeray on Aaditya Thackeray : अर्धा समुद्र भावाच्या मतदारसंघात, स्वच्छ करणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं लागलीच उत्तर, म्हणाले…

हेही वाचा : घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धार्मिक विधींना मोठे महत्त्व देतात. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी मधील कामाख्या देवीचे मंदिर गाठले होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या सर्व आमदारांसह पुन्हा कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. तर विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदे पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्याच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. गेल्या दोन दिवसात भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी घोषित करण्यात आली आहे. या याद्यांच्या निमित्ताने या तिन्ही पक्षांनी एक असाधारण योग साधल्याचे दिसून आले आहे. हा योग म्हणजे नऊ आकड्याचा योग. भाजपने रविवारी आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अनेक जागांवर निश्चित उमेदवारांचे नाव समाविष्ट नव्हते.

मात्र या ९९ आकड्याचा शुभांक नऊ येतो. मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात उमेदवारांची संख्या होती ४५. राज ठाकरे यांनी मनसे पक्ष राज्यात सर्वाधिक जागा लढवेल असे घोषित केले होते. मात्र त्यानंतरही त्यांनी फक्त ४५ उमेदवारांचीच यादी जाहीर केली. या ४५ आकड्यातूनही ठाकरे यांनी नऊचा योग साधल्याचे बोलले जाते. राज ठाकरे यांच्या वाहनांचा क्रमांक नऊ आहे त्यांच्या पक्षाची स्थापना आहे ९ मार्च रोजी झाली आहे. राज ठाकरेंसाठी नऊ हा शुभ अंक मानला जातो अशा चर्चा आहेत.

हेही वाचा : संदीप नाईकांच्या बंडामुळे महायुती एकवटली

मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेच्या शिंदे गटाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली या यादीतही ४५ उमेदवारांचा समावेश होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अनेक विद्यमान आमदारांची नावे या यादीत समाविष्ट झाली नाहीत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे. मात्र तरीही ४५ आणि विशिष्ट नऊचा योग साधण्यासाठी फक्त ४५ उमेदवारांची यादी केली गेल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचा क्रमांक ५६७ असा आहे. या क्रमांकाचा शुभांकही नऊ येतो. त्यामुळे हाही फक्त योगायोग नाही, अशी चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp shivsena and mns candidate list highlights 9 as lucky number print politics news css

First published on: 23-10-2024 at 16:37 IST

संबंधित बातम्या