आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप १ वर्ष बाकी आहे. असे असताना या निवडणुकीची भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपाने मागील निवडणुकीत पराभव झालेल्या जागांचा शोध घेऊन या जागांवर जनसंपर्क वाढवण्यासाठी तसेच या जागा काबीज करण्यासाठी ‘लोकसभा प्रवास योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत भाजपाने नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली असून प्रत्येक मतदारसंघावर लक्ष द्यावे, असे सांगितले आहे.

काय आहे लोकसभा प्रवास योजना?

41 aspirants in eight constituencies of pune NCP Sharadchandra Pawar party preparing for assembly
शहरातील आठ मतदारसंघांत ४१ इच्छुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची तयारी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
Iltija Mufti : आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; परदेशातील भारतीय संस्थांचा अनुभव असलेल्या इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड?
AIMIM, Solapur, Congress, AIMIM Solapur,
एमआयएमच्या उमेदवारीने सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ ?
Imtiaz Jaleel, constituency, contest,
इम्तियाज जलील कोणत्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता कायम, संभाजीनगर पूर्व की मध्यचा पर्याय निवडणार ?
Curiosity about Imtiaz Jalil will contest election from which constituency is remains
इम्तियाज जलील कोणत्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता कायम
pakistan security 1
नंदनवनातील निवडणूक: पाकिस्तानप्रेमी ‘जमात’ आता निवडणुकीच्या रिंगणात
Lok Sabha Elections Shrikant Shinde Navi Mumbai Municipal budget State Government
केवळ १४ गावांचा अर्थसंकल्पाच्या दुप्पट भार

भाजपाने लोकसभा प्रवास योजनेला मागील वर्षापासूनच सुरुवात केलेली आहे. या याजनेंतर्गत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. या योजनेत ज्या मतदारसंघांमध्ये विजयासाठी अधिक ताकद लावावी लागणार आहे, त्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा कमी फरकाने पराभव झालेला आहे, तसेच ज्या मतदारसंघात भाजपाचा उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे, त्याच मतदारासंघांची यात निवड करण्यात आली आहे.

अगोदरच्या टप्पात या मोहिमेंतर्गत अशा १४४ मतदारसंघाना निवडण्यात आले होते. मात्र ही संघ्या आता १६० पर्यंत वाढवण्यात आली आहे. भाजपाचे आगामी काळात या १६० जागांवर विशेष लक्ष असणार आहे.

हेही वाचा >>> शालेय पोषण आहारात मांसाहार देण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय, भाजपासह विरोधकांची टीका; म्हणाले, “हा निर्णय…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी २५ मे रोजी लोकसभा प्रवास योजनेची सुरुवात केली होती. या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या मतदारसंघांवर जबाबदारी मंत्र्यांकडे किंवा वरिष्ठ नेत्यांकडे देण्यात आली आहे. प्रभारी म्हणून नेमलेल्या या मंत्र्यांना संघटना मजबूत करणे तसेच कार्यकर्त्यांना प्रेरित करत राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या योजनेंतर्गत भाजपाने प्रत्येक मतदारसंघासाठी पूर्णवेळ स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत या स्वयंसेवकांवर मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्याची जबाबदारी असेल. पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांसोबत या स्वयंसेवकाला काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> काश्मीर खोऱ्यात ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी होणे केंद्र सरकारसाठीही लाभदायी

भाजपाने निवडलेले १६० मतदारसंघ कोठे आहेत?

भाजपाने निवडलेले मतदारसंघ पश्चिम बंगाल, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, केरळ, ओडिसा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या प्रमुख राज्यांत आहेत. तसेच अन्य राज्यातही काही मतदारसंघ आहेत. भाजपाने महाराष्ट्रात अशा १६ मतदारसंघांची निवड केलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती या मतदारसंघाचाही समावेश आहे.

दरम्यान, २०१९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकूण ४३६ जागा लढवल्या होत्या. यातील ३०३ जागांवर भाजपाचा विजय झाला होता. त्यामुळे लोकसभा प्रवास योजनेचा भाजपाला किती फायदा होणार? भाजपाची ही रणनीती यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.