केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तमिळनाडूमध्ये ११ जून रोजी सभा घेऊन मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीबद्दल माहिती दिली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक पक्षासोबत युतीमध्ये राज्यातील २५ जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प सोडला. अमित शाह यांनी सभा घेऊन पाठ फिरवताच दुसऱ्या दिवशी तमिळनाडूमधील राजकारण पेटले आहे. भाजपाचे तमिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच के. अण्णामलाई यांच्याविरोधात निषेधाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तमिळनाडूमधील भाजपा आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याचवर्षी एप्रिल महिन्यात अमित शाह यांनी अन्नामलाई आणि अण्णाद्रमुकचे सरचिटणीस इडाप्पडी के पलानीस्वामी यांना एकत्र बसवून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर दोघांमधील वाद कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाला अन्नामलाई यांनी एक मुलाखत दिली, जी सोमवारी (दि. १२ जून) छापून आली आहे. या मुलाखतीत ते म्हणतात, “मी कोणत्या एका पक्षाचे नाव घेणार नाही. पण जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणारे कोणाचेही सरकार असले तरी त्यांना आम्ही प्रश्न विचारणारच. तमिळनाडूमधील प्रशासनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. माजी मुख्यमंत्र्यांना (जयललिता) देखील न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यामुळेच तमिळनाडू सर्वात भ्रष्ट राज्य म्हणून ओळखले जाते. मला तर वाटते भ्रष्टाचारात हेच राज्य प्रथम असावे.”

Amit Shah Rally cancle
Amit Shah Rally: अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर निर्णय
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
Chhagan Bhujbal on Rajdeep Sardesai book
Chhagan Bhujbal: ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपाशी हातमिळवणी’, पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले…

अन्नामलाई अपरिपक्व नेते

अन्नामलाई यांची मुलाखत प्रसिद्ध होताच अण्णाद्रमुकचे (AIADMK) प्रवक्ते आणि माजी मंत्री डी. जयाकुमार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “अन्नामलाई हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी अयोग्य आणि अपरिपक्व असून त्यांनी आघाडीचे संकेतही पायदळी तुडवले आहेत”, अशी टीका जयाकुमार यांनी केली. अन्नामलाई यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-अण्णाद्रमुक यांची आघाडी नको आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर न पोहचू देण्याचा त्यांचा काही गूप्त हेतू आहे का? असे सवाल उपस्थित करत जयाकुमार म्हणाले की, अन्नामलाई यांना केवळ चमकोगिरी करण्यात अधिक रस आहे.

हे वाचा >> ‘माजी आयपीएस, भाजपा नेते के. अन्नामलाई अनियंत्रित व्यक्ती की गुप्त शस्त्र’, भाजपाची नेमकी गोची कुठे झाली?

अन्नामलाई हे कर्नाटक कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत. ३९ वर्षीय अन्नामलाई यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर तीनच वर्षात त्यांची तमिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. जयाकुमार म्हणाले की, तमिळनाडूमध्ये भाजपा केवळ एका रोपट्याएवढे लहान आहे, तर अण्णाद्रमुक वटवृक्षाएवढा मोठा आहे. त्यामुळे दिल्लीतील नेत्यांनी अन्नामलाई यांना शिस्तीचे धडे शिकवायला हवेत.

जयललिता क्रांतिकारी नेत्या, त्यांच्यावरील टीका मान्य नाही

माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनीही अन्नामलाई हे बेजबाबदार आणि अपरिपक्व असल्याचे सांगत टीका केली. ते म्हणाले, चेन्नईमधील पक्षाच्या सचिवांनी अन्नामलाई यांच्याविरोधात निषेधाचा ठराव मंजूर केला आहे. अन्नामलाई यांनी माजी मुख्यमंत्री क्रांतीकारी नेत्या, इधाया देविम (जयललिता यांचे अनुयायी त्यांना ‘देवी’ संबोधतात) जयललिता यांचा नियोजित पद्धतीने अवमान केलेला आहे. भाजपा आणि अण्णाद्रमुक यांच्या आघाडीबाबत बोलताना पलानीस्वामी म्हणाले, आमची आघाडी केवळ २०२४ च्या निवडणुकीपुरती आहे. दुरदृष्टीचा विचार करता राज्यात राष्ट्रीय पक्षासोबत आघाडी करणे आम्हाला गैरसोयीचे ठरणार आहे. तसेच भाजपालाही आपली पक्ष संघटना वाढवायची आहे. भाजपा आणि आम्ही गरजेपुरते एकत्र आलो आहोत, ही आमची निवड नाही.

अण्णाद्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम हे स्वतःला जयललिता यांचे खरे वारसदार मानतात. पण पलानीस्वामी यांनी त्यांना पक्ष संघटनेत हद्दपार केले आहे. पनीरसेल्वम म्हणाले की, अन्नामलाई यांनी हे लक्षात ठेवावे की, जयललिता यांना न्यायालयाने निर्दोषत्व बहाल केले आहे. “पण गाढवाला गुळाची चव काय?” अशा अर्थाची एक तमिळ म्हण वापरून पनीरसेल्वम यांनी अन्नामलाई यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान अन्नामलाई यांनी जाहीर केले होते की, अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांच्या विरोधात भाजपा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढणार आहे. जर अण्णाद्रमुक पक्षासोबत पक्षाने लोकसभा निवडणूक लढविली तर आपण प्रदेशाध्यक्षपद सोडायला तयार आहोत, अशीही घोषणा त्यांनी केली होती. तमिळनाडूमधील भाजपाच्या दोन मोठ्या नेत्यांनी सांगितले की, अन्नामलाई अनपेक्षित हालचाली आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काही कळायला मार्ग नाही. तसेच ते जे काही बढाया मारत आहेत, ती भाजपाची योजना तर नक्कीच नसणार आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचाही अन्नामलाईंना विरोध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने अन्नामलाई यांच्याबाबत भाष्य केले आहे. “आम्ही भाजपा नेत्यांना एप्रिल महिन्यातच सांगितले होते की, जून महिन्यात अन्नामलाई यांना पदावरून दूर करावे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच त्यांना पुन्हा पदावर घ्यावे. सध्यातरी आम्ही अन्नामलाई आणि अण्णाद्रमुक पक्षामध्ये चाललेल्या वादाचे मूक प्रेक्षक आहोत”, अशी प्रतिक्रिया संघाच्या नेत्याने दिली.