सांगली : इस्लामपूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पर्यायाने आमदार जयंत पाटील यांचा पारंपारिक गड. याच मतदारसंघामध्ये महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांचेही वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामागे भाजपची ताकद असल्याचे स्पष्टच दिसते.

आमदार जयंत पाटील यांचा पारंपारिक विरोधक म्हणून महाडिक गट वाळव्याच्या राजकारणात माहीर आहेच. या शक्तीतूनच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहूल महाडिक यांनीही विधानसभेसाठी पेरणी सुरू केली असून यासाठी स्व. नानासाहेब महाडिक यांच्या ताकदीचा पूरेपूर उपयोग करण्यात येत आहे. इस्लामपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांचा एक गट तर कार्यरत असून मागील निवडणुकीमध्ये पाटील यांचा बालेकिल्ला खालसा करण्यात या महाडिक युवा शक्तीची ताकदही कामी आली होती.

will Mahavikas Aghadi hit by Maratha Shakti experiment in 120 constituencies in assembly election
१२० मतदारसंघांत ‘मराठा शक्ती’च्या जरांगे प्रयोगाचा महाविकास आघाडीला फटका?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Mahavikas Aghadi Pune, Mahavikas Aghadi in dillema,
पुण्यातील चार जागांवरून महाविकास आघाडीत तिढा
Mahadev Jankar left Mahayuti, Gangakhed BJP,
‘सुंठे वाचून खोकला गेला’ जानकरांच्या भूमिकेनंतर गंगाखेडमध्ये भाजपला आनंद
Prakash Solanke Majalgaon, Prakash Solanke latest news,
प्रकाश सोळंकेंच्या माजलगावमध्ये ‘तुतारी’ चा आवाज वाढला
Jayant Patil, Jayant Patil news, Jayant Patil latest news,
जयंत पाटील यांना घेरण्याचे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांचेही प्रयत्न
Deputy Chief Minister Ajit Pawar NCP will contest assembly elections from Pathri constituency print politics news
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पाथरीवर लक्ष
Chief Minister Eknath Shinde Shiv Sena challenges BJP leaders in Boisar Assembly Election 2024
मुख्यमंत्री शिंदे यांच्या खेळीने बोईसरमध्ये भाजप नेते अस्वस्थ

हेही वाचा – संसदेत विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार; भाजपा हे आव्हान कसे पेलणार?

जयंत पाटील यांची त्यांच्या मतदारसंघातच कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपकडून होणार हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनी गत निवडणुकीत आमदार पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची उमेदवारी भाजप-शिवसेना यांच्या विरोधातील बंडखोरी होती. ही चूक टाळून पुन्हा एकदा आव्हान उभे करण्याचे त्यांचे प्रयत्न असले तरी सद्यस्थितीत विरोधकांत असलेले अंतर्गत मतभेद व मनभेद दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नगरपालिका निवडणुकीवेळी भाजप, काँग्रेस, शेतकरी संघटना, महाडिक युवा शक्ती, शिवसेना त्यांच्यासोबत होते. या विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेत चार सदस्य महाडिक यांचे नेतृत्व मानणारे निवडून आले होते. यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये विकास आघाडीला मिळालेले यश केवळ माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांचेच होते असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. मात्र, नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या विकास आघाडीतच बेबनाव निर्माण झाला. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विक्रम पाटील यांनी काहीशी फारकत घेतल्याचे दिसून येत असून हा बेबनाव दूर करण्याचे अद्याप प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही.

दुसर्‍या बाजूला पेठच्या महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तरुण संचालक राहूल महाडिक यांचे नेतृत्व रूजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इस्लामपूर, पर्यायाने वाळवा तालुक्यात आमदार पाटील यांचा पारंपारिक विरोधी गट म्हणून महाडिक यांच्या गटाची ओळख आहे. अगदी गावपातळीपर्यंतही विरोधकांची शक्ती कार्यरत आहे. वाळवा पंचायत समितीमध्येही सत्ता जरी राष्ट्रवादीची राहिली असली तरी प्रखर विरोधकांची भूमिका महाडिक गटानेच निभावली आहे. मागील पंचायत समिती सभागृहात २० पैकी सहा सदस्य या गटाचे होते, तर पेठ, येलूर, चिकुर्डे, कामेरी या जिल्हा परिषद गटामध्ये विरोधकांना ताकद देण्याचे काम महाडिक गटाने केले होते. पंचायत समिती सभागृहाला स्व. वसंतदादा पाटील यांचे नाव बदलून स्व. राजारामबापू यांचे नाव देण्यावरूनही राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. वसंदादांचे नाव कायम राहावे यासाठी महाडिक गटाने आंदोलनही केले होते. सार्वजनिक कामावर खर्च केला जाणारा निधी असो महाडिक गटाने आग्रही भूमिका बजावली आहे. दिवाळीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही या गटाने सुमारे १४ गावांत सत्ता काबीज केली असून काही ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करीत वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा – विदर्भातील शहर, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीत भाजपचे ‘ओबीसी कार्ड’

आमदार पाटील यांना विरोधक कोण याचे उत्तर महाडिक गटाकडे मिळू शकते. या दृष्टीने चाचपणी भाजपने केली तर त्यात वावगे वाटण्याचे कारण नाही. एकसंघ विरोधक उभे करण्यासाठी विकास आघाडीवेळी जशी बोलणी करण्यात वरिष्ठ नेत्यांनी रस दाखवला तसा रस यावेळीही दाखविण्याची गरज आहे. यातून भाजपचे मूळ निष्ठावान असलेला गट नाराज होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

भाजपची सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्षपद वाळवा तालुक्याला देण्यात आले आहे. या निमित्ताने माजी नगराध्यक्ष पाटील यांचा जिल्हाभर संपर्क दौरा सुरू आहे. आमदार पाटील यांच्या विरोधात इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजपमध्ये एकास एक लढत करण्याचे प्रयत्न अखेरपर्यंत होणार यात शंका नाही. गेल्यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळव्याचे माजी सरंपच गौरव नायकवडी यांना उमेदवारी देण्यात पुढाकार घेतला होता. मात्र हुतात्मा समूहाची ताकद मर्यादित गावातच आहे. मतदारसंघामध्ये ५४ गावे आहेत. या पैकी येलूर, ताकारी, कुंडलवाडी, किे मच्छिंद्रगड आदी गावात महाडिक शक्तीचे प्राबल्य ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले. आता या संख्याबळाची बेरीज वजाबाकी विधानसभा निवडणुकीत होईलच. मात्र, भाजपला मोर्चेबांधणी करण्यासाठी या सर्व बाबींचा विचार प्राधान्याने करावा लागणार असे दिसते.