भारतीय जनता पार्टीने शुक्वारपासून (३ फेब्रुवारी) त्रिपुरामध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रचाराला सुरुवात केली. निवडणुकीपर्यंत नड्डा यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या राज्यभरात ३५ प्रचारसभा होणार आहेत. यावेळी नड्डा यांनी विकास आणि राज्यातील हिंसाचाराचा अंत अशा दोन मुख्य मुद्द्यांना हात घातला.

नड्डा यांची पहिली सभा गोमती जिल्ह्यातील अमरपूर येथे झाली. येथे आयोजित ‘विजय संकल्प यात्रे’दरम्यान त्यांनी काँग्रेस-आघाडीवर जोरदार टीका केली. नड्डा म्हणाले की, “डावे आणि काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात बंडखोरी, राजकीय हत्या, हिंसाचार वाढला. तसेच लूटमार होत होती.”

विरोधकांची स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड : नड्डा

नड्डा यांनी यावेळी विरोधकांवर जोरदा हल्ला चढवला. ते म्हणाले की, “जे लोक आमच्या विरोधात लढत आहेत, ते कोण आहेत? त्यांनी ही युती (डावे आणि काँग्रेस) कशासाठी केलीय माहितीय का? हा केवळ त्यांचा स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठीचा अट्टाहास आहे. त्रिपुराला देशात आणि जगात पुढे नेण्यासाठी आम्ही लढत आहोत. आमची ही लढाई तरुणांना नवे पंख देण्यासाठी, महिलांच्या सन्मानासाठी, विकास आणि व्यापाराला चालना देण्यासाठी सुरू आहे.”

हे ही वाचा >> Rahul Gandhi letter to PM Modi : “…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता”, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारक स्मृती इराणी देखील त्रिपुरात दाखल झाल्या आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक देखील राज्यभर भाजपाचा प्रचार करणार आहेत. भौमिक या त्रिपुरात निवडणूक देखील लढवत आहेत. यासह आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी या प्रचारसभेत सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधील भाजप नेते दिलीप घोष यांनी भाजपच्या त्रिपुरातील विजय संकल्प यात्रेला हजेरी लावली.

Story img Loader