राज्य विधानसभा आणि लोकसभेच्या एकाच वेळी होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ओडिया अस्मिता (PRIDE) या मुख्य मुद्द्याला हात घातला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्ही. के. पांडियन यांच्या उदयाला लक्ष्य करत पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धूमधडाक्यात सुरुवात केली होती. पांडियन हे तामिळनाडूमध्ये जन्मलेले माजी आयएएस अधिकारी असून, त्यांना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी मानले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ च्या निवडणुकीत बीजेडीकडून भाजपाची डोकेदुखी वाढवणारे पांडियन हे ओडियासंदर्भातील मुद्दे उपस्थित करून मोदी आणि नड्डा यांची अडचण वाढवत आहेत. तामिळनाडूचे असलेले पांडियन हे माजी IAS अधिकारी आहेत, ज्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले. काही महिन्यांपूर्वी IAS पदावरून स्वेच्छेने निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना 5T ट्रान्सफॉर्मेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. खरं तर ही जबाबदारी कॅबिनेट मंत्र्याच्या समतुल्य भूमिका असते. बीजेडीमध्ये ते कोणतेही अधिकृत पद धारण करत नसले तरी त्यांचा पक्षात मोठा प्रभाव आहे, काही जण त्यांना विरोध करण्याचेही धाडस करीत नाहीत. वृद्ध पटनायक यांच्याकडून ते पदभार स्वीकारू शकतात, ज्यांना त्यांची शेवटची निवडणूक लढवताना आपण पाहतोय, असेही राजकीय विश्लेषक सांगतात. पांडियन यांच्या उदयाने बीजेडीच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे अनुभवी नेत्यांना भीती सतावते आहे.

ओडिया अभिमानाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आणि ओडिशाच्या विकासाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या प्रादेशिक पक्षाला पांडियन यांच्या मुद्द्यावरून विरोध करण्याची संधी भाजपा आणि काँग्रेसला मिळाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ओडिशातील त्यांच्या शेवटच्या जाहीर सभेत पांडियन यांचे नाव घेतले होते. भाजपाचे नेते आधीपासूनच पांडियन यांना लक्ष्य करीत आहेत. पांडियन यांच्या प्रत्येक कृतीला विरोधकांकडून उत्तर दिले जाते. पांडियन यांनी गेल्या वर्षी पुरी येथील श्रीजगन्नाथ मंदिरातील प्रवेशासाठी सोशल मीडिया प्रभावक काम्या जानीला मदत केल्याचा भाजपाने आरोप केला होता. जानी गोमांस सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखल्या जात होत्या, त्यामुळे पांडियन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती.

हेही वाचाः ठाण्यात नरेश म्हस्के यांच्याकडून मतांची जुळवाजुळव

भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी अलीकडेच पांडियन यांचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाची पोलखोल करणारी ६० पृष्ठांची पुस्तिका प्रसिद्ध केली होती. माजी नोकरशहाची छायाचित्रे १५ स्वतंत्र पानांमध्ये दाखवली गेली, तर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा केवळ १० पृष्ठांनी व्यापलेली होती. पांडियन यांनी २०२३ मध्ये हेलिकॉप्टरने लोकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी सर्व जिल्ह्यांचा दौरा केला होता, तेव्हा भाजपाने त्यांच्यावर घटनाबाह्य सत्ता चालवल्याचा आणि राज्याच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप करत भयंकर हल्ला केला होता. पांडियन यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देण्यासाठी बीजेडीचे ज्येष्ठ मंत्री आणि BJD मधील प्रमुख व्यक्तींचे दर्शन जनतेला आवडले नाही.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार अपराजिता सारंगी यांसारखे माजी ओडिशा नोकरशहा हे इतर राज्यातील आहेत, तरीसुद्धा ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि भाजपाचे सदस्यदेखील आहेत, तरीही ओडिशाचा ताबा घेण्याच्या इतक्या जवळ कोणीही दिसत नाही. भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांच्या म्हणण्यानुसार, ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदी पांडियन यांना बसवण्यात नाराजीचा सूर उमटत होता आणि लोकांनी त्यावर टीका केली होती. आता भाजपा आणि बीजेडी यांच्यात थेट लढत होत असल्याने भाजपा नेत्यांनी मतदानाचा मुद्दा म्हणून ओडियाच्या अभिमानाशी जोडला आहे. खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, “ओडिया अभिमानाची गरज अधिकाधिक स्पष्ट होत आहे आणि ओडिया अभिमान धोक्यात आला आहे. ओडिया भाषेलाही संकटाचा सामना करावा लागत आहे. मला वाटत नाही की ओडिया हे जास्त काळ सहन करतील.”

रविवारी बेरहामपूरजवळील एका जाहीर सभेत नड्डा म्हणाले की, बाहेरील व्यक्ती आयात करून त्यांना राज्यात उत्तराधिकारी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपहासात्मक टीका करत त्यांनी विचारले की, ओडिशा राज्याचे नेतृत्व करण्यासाठी राज्यातील कोणताही नेता शिल्लक नाही का? प्रदीर्घ हल्ल्याने खचून न जाता पांडियन यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी बीजेडीचे स्टार प्रचारक म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. बीजेडीने एक निवेदन जारी केले की, “हजारो वर्षांपासून अभिमानी ओडियांनी नेहमीच ओडिया संस्कृतीचे अत्यंत कठोरपणे संरक्षण केले आहे. ओडिया संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ओडिशाला भाजपासारख्या राजकीय पक्षाची गरज नाही. ओडिया संस्कृती जगातील कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा खूप मोठी आहे. आधी भाजपाने ओडिया संस्कृती समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या राजकीय नेत्यांवर घृणास्पद गुन्हे आहेत, अशा सर्व राजकीय नेत्यांना त्यांचे नेते बनवण्याची आणि २०२४ मध्ये निवडणूक लढवण्यासाठी पक्षाची तिकिटे देण्याची त्यांची संस्कृती आहे,” असेही प्रादेशिक पक्षाने म्हटले आहे. भाजपा ओडिशातील राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp took up the issue of odia identity to catch bjd in a quandary what will happen in the election vrd