एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने सावरकर गौरवयात्रा काढली. सोलापूर जिल्ह्यात सावरकर गौरवयात्रांच्या माध्यमातून भाजपने स्वतःची ताकद भक्कम करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. शिंदे गटाचा सहभाग तुलनेत कमीच होता.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…

लव्ह जिहाद, धर्मांतर आदी मुद्यांवर हिंदू गर्जना मोर्चा, हिंदू आक्रोश मोर्चांच्या माध्यमातून संघ परिवारातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, गोरक्षक संघटना, हिंदू जनजागृती समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन प्रदर्शन केले. या मोर्चांमध्ये चिथावणीखोर भाषणे झाली. यात अर्थातच भाजपचाही सहभाग होता. त्यापाठोपाठ गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंतीसारख्या धार्मिक उत्सवांचे औचित्य साधून भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमकपणे आपली ताकद दाखवून दिली. हिंदू मतपेढी बळकटीसाठी हा सारा खटाटोप चालला असताना त्यात सावरकर गौरवयात्रांची भर पडली. सोलापूर जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघांमधून निघालेल्या सावरकर गौरवयात्रांवर भाजपचाच प्रभाव दिसून आला. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सहभाग अभावानेच दिसून आला.

हेही वाचा… अकोल्यातील खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग ; भाजप व ठाकरे गटात संघर्ष

अगोदरच शिंदे प्रणीत शिवसेनेच्या मर्यादा असताना भाजपनेही सावरकर गौरवयात्रांमध्ये शिवसेनेला पध्दतशीरपणे बाजूलाच ठेवल्याचे पाहायला मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वतःची ताकद अधिक भक्कम करण्यावर भर देताना त्यात शिवसेनेची कुवत लक्षात आणून दिल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे शिवसेनेचा सावरकर गौरवयात्रांमध्ये जाणीवपूर्वक सहभाग घेतला नसल्याचे चित्रही सांगोल्यासारख्या भागात दिसून आले.

हेही वाचा… भाजपकडून आत्तापर्यंत १६ विद्यमान आमदारांची गच्छंती

राज्यात शिवसेना फुटीच्यावेळी सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या तंबूत गेले. गुवाहाटीत असताना ‘ काय झाडी, काय डोंगार..काय हाटिल..समदं ओक्केमंदी ‘ हा शहाजीबापूंचा संवाद झटक्यात प्रसिध्द झाला आणि ते वलयांकित नेते झाले. एकनाथ शिंदे यांनीही शहाजीबापूंवर खूष होऊन त्यांना शिवसेनेचे उपनेते केले. मात्र हेच शहाजीबापू पाटील सांगोल्यात असूनही सावरकर गौरवयात्रेकडे फिरकले निहीत. भाजपचे नेते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला भागात सावरकर गौरवयात्रा काढण्यात आली असता त्यात भाजपचेच नेते व कार्यकर्ते दिसत होते. शिवसेनेचे आमदार असूनही शहाजीबापू पाटील यांनी या गौरवयात्रेकडे पाठ का फिरविली ? यात मोहिते-पाटील यांच्याशी पटत नाही म्हणून ते दूर राहिले का, यावर प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते.

हेही वाचा… Karnataka Election 2023 : तिकीट न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांमध्ये असंतोष; भाजपा बंडाळी कशी रोखणार?

बार्शी तालुक्यात भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि शिंदे गटाचे नेते, निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. भाजपचे दुसरे नेते राजे मिरगणे यांचेही आमदार राऊत यांच्याशी कधीच पटले नाही. त्याचा विचार करता आमदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सावरकर गौरवयात्रेत आंधळकर आणि मिरगणे यांच्याकडून सहभागाची अपेक्षा करणेच चुकीचे होते. सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य मतदारसंघात भाजपने सावरकर गौरवयात्रा काढली असता त्यात शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचाच काय तो सहभाग दिसून आला. भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या शहर उत्तर मतदारसंघात निघालेल्या गौरवयात्रेत शिंदे गटाचे दुसऱ्या फळीतील काही मोजकीच मंडळी सामील झाली होती. उर्वरीत आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूरसह भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा अक्कलकोट आदी ठिकाणीही सावरकर गौरवयात्रा शिवसेनेला दूर ठेवूनच काढण्यात आली.

हेही वाचा… राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती राष्ट्रीय पक्ष होते? जाणून घ्या…

सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचे चार शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. अमोल शिंदे, मनीष काळजे, चरणराज चवरे आणि महेश चिवटे अशा चार जिल्हाप्रमुखांकडे प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. सावरकर गौरवयात्रेत एकट्या अमोल शिंदे यांचा (सोलापूर शहर मध्य) एकमेव अपवाद वगळता इतर एकाही शिवसेना जिल्हाप्रमुखाचा सहभाग दिसून आला नाही. एकंदरीत सावरकर गौरवयात्रा वरकरणी भाजप आणि शिंदे गटाच्या संयुक्त सहभागतून अपेक्षित असताना प्रत्यक्षात भाजपच वरचढ असल्याचे पाहायला मिळाले. यातून शिंदे गटाचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.