विश्वास पवार

वाई: सातारा पालिका निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढविण्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ठाम असल्याने भाजप अंतर्गतच शहरातील सत्ताधारी आणि विरोधक अशा उदयनराजे – शिवेंद्रराजे भोसले या दोन गटांची भूमिका काय राहणार हे पाहणे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा… जळगाव जिल्हा दूध संघातील राजकीय रणधुमाळी; खडसे कुटुंबियांना धक्क्यावर धक्के

बावनकुळे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा नुकताच केला. या दौऱ्याची सुरुवात साताऱ्यातून त्यांनी केली. साताऱा जिल्हा एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. परंतु गेल्या काही वर्षांत भाजपने या जिल्ह्यातील आपले स्थान भक्कम केले आहे. भविष्यात हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला करण्यासाठी सध्या अनेक केंद्रीय मंत्र्यांसोबतच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सातारा जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बावनकुळे यांचा दौराही याचाच भाग होता. साताऱ्याच्या या दौऱ्यात त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत ठेवत एकप्रकारे गटबाजी संपवत पक्ष म्हणून एकत्र येण्याचा संदेश दिला आहे. तसेच हा संदेश देतानाच भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार जयकुमार गोरे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाचीही पाठ थोपटली.

हेही वाचा… ९३ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक लीला चितळे म्हणतात देशाचे संविधान संकटात

साताऱ्यात भाजपची ताकद वाढली असली तरी त्यांची खरी लढत आजही राष्ट्रवादी काँग्रेसशीच असल्याने बावनकुळे यांनी पक्षाचे संघटन मजबूत करण्याबरोबरच या दौऱ्यात राष्ट्रवादीलाच आपले मुख्य लक्ष्य केले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला आहे. सातारा जिल्ह्यातील लढत भाजप आणि राष्ट्रवादी अशी असल्याने तिथे हा हल्ला उपयोगाचा होता. मात्र सातारा शहरातील स्थिती निराळी आहे. सध्या शहर आणि लगतच्या तालुक्यावर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन नेत्यांचेच वर्चस्व आहे. हे दोन्हीही नेते भाजपचे असले तरी त्यांचे पक्षांतर्गत दोन गट स्वतंत्ररित्या कार्यरत असतात. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांसमध्येही आजवरच्या निवडणुकीप्रमाणे या दोन राजांच्या गटातच लढत होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेस तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या या तयारीमुळे दोन राजांच्या भांडणात तिसऱ्या गटाचा फायदा होऊ नये यासाठी भाजपाने ही निवडणूक पक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दोन्ही राजांचे पक्ष जरी एक असले तरी पालिका निवडणुकीत आजपर्यंत त्यांचे गट एकमेकांविरुद्ध लढत आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी त्यांना पक्ष म्हणून एकत्र येण्याची एकप्रकारे सूचना केलेली आहे. या वेळी उदयनराजे – शिवेंद्रराजे यांच्या गटांची भूमिका काय राहणार हे पाहणे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… एक शक्ती आहे…जी पुढे ढकलते आहे….कन्याकुमारी पासून पायी चालत असलेल्या तरुणीच्या भावना

सातारा पालिकेचा कार्यकाळ संपला असून पालिका निवडणुकीचे येत्या काही दिवसांत बिगुल वाजणार आहे. या संपलेल्या काळात सातारा पालिकेवर सध्या उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता होती, तर त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची नगरविकास आघाडी विरोधी बाकावर होती. परंतु बावनकुळे यांच्या मनोदयाप्रमाणे या दोन्ही गटांना एकत्र यायचे झाल्यास एकप्रकारे साताऱ्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटांनाच एकत्र यावे लागणार आहे. साताऱ्याच्या विकासासाठी आणि पक्षाची दुभंगलेली ताकद वाढवण्यासाठी या दोन्ही राजांना एकत्र आणण्याचा विडा बावनकुळे यांनी उचलला आहे. मात्र त्यात किती यश येते हे येत्या काळातच दिसून येईल.

Story img Loader