Rahul Gandhi vs BJP Parliament incident : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर भाजपाचे ३३ वर्षीय खासदार हेमांग जोशी हे शुक्रवारी सायंकाळी गुजरातच्या बडोदा विमानतळावर दाखल झाले. यावेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. साधारणत: पाच महिन्यांपूर्वी हेमांग जोशी हे राज्यातील सर्वात तरुण खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते. गुरुवारी, संसदेच्या संकुलात भाजपा आणि इंडिया आघाडीच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी जोशी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच भाजपाचे जखमी झालेले बालासोरचे खासदार प्रताप सारंगी यांचीही ते विचारपूस करताना दिसले.

राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार

भाजपा आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर संसदेच्या सभागृहाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या काही तासांनंतर खासदार हेमांग जोशी यांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत शारीरिक हल्ला करणे यासह अन्य आरोपांची नोंद केली.

महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra cabinet
चावडी : सांगलीचे ‘साहेब’
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
Photo Of MLA Sanjay Kelkar.
BJP MLA : “मी लायक वाटलो नसेन…” मंत्रिपद न मिळाल्याने भाजपा आमदाराची खदखद
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!

हेही वाचा : महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?

दरम्यान, गुजरातच्या वडोदरा येथे दाखल झाल्यानंतर भाजपा खासदार हेमंत जोशी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी जोशी म्हणाले, “विरोधकांनी कोणतेही कारण नसताना संसदेत वारंवार गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज ४० टक्के कमी झाले.” मी विचारलेल्या तीन प्रश्नांवर सविस्तर चर्चा झालीच नाही. एक तरुण खासदार म्हणून माझ्यासाठी ही दु:खाची बाब आहे. काँग्रेस पक्षाच्या खासदारांना प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय आहे, तर भाजपाकडून दरवेळी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, यावेळी विरोधी इंडिया आघाडीतील काही खासदार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून खोटा अपप्रचार करीत होते, त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व एका व्यक्तीच्या अहंकारामुळे घडले”, असा आरोपही जोशी यांनी केला.

दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत हेमांग जोशी यांनी दावा केला की, “काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षातील नेते आंदोलने करून चुकीची माहिती देत होते. त्यामुळेच भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील खासदारांनी त्यांचा निषेध केला.”

कोण आहेत हेमांग जोशी?

हेमांग जोशी हे वडोदरा महानगरपालिकेच्या स्कूल बोर्डाचे माजी उपाध्यक्ष आहेत. व्यवसायाने ते फिजिओथेरपिस्टदेखील आहेत. एमएस विद्यापीठातून मानव संसाधन व्यवस्थापन विषयात जोशी यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. वडोदरा येथील संरक्षण स्टार्ट-अपमध्ये एचआर मॅनेजर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. हेमांग जोशी हे आध्यात्मिक नेते व्रजराजकुमार गोस्वामी यांच्या नेतृत्वाखालील वल्लभ युवा संघटनेचे (VYO) वडोदराचे अध्यक्षदेखील आहेत. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांबरोबरही जवळचे संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी ते गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या युवा शाखेचे सक्रिय सदस्य होते.

वडोदराचे दोनवेळा खासदार राहिलेल्या रंजनबेन भट्ट यांच्या जागी हेमांग जोशी यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. वडोदरा हा एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. दरम्यान, वल्लभ युवा संघटनेचे पूर्वीचे अध्यक्ष परेश शाह यांना हरणी बोट दुर्घटना प्रकरणात अटक झाल्यानंतर हेमांग जोशी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. १८ जानेवारी २०२४ रोजी वडोदरा येथील हरणी तलावात बोटिंग करताना १२ मुले आणि दोन शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

हेमांग जोशी यांनी तक्रारीत काय म्हटलं?

दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत हेमांग जोशी यांनी दावा केला की, “संसद भवनाबाहेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) खासदार शांततेत निषेध आंदोलन करीत होते, त्यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सकाळी १०.४० च्या सुमारास संसदेच्या मकर गेटवर पोहोचले. संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना या दिशेने जाऊ नका, अशी विनंती केली होती. परंतु, तरीही राहुल गांधी हे जाणूनबुजून एनडीएच्या खासदारांच्या दिशेने आले. त्यांनी निषेध आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलकांची सुरक्षा धोक्यात घालून बळजबरीने विरोधी पक्षातील खासदारांना गेटमधून प्रवेश करण्यास सांगितले. राहुल गांधी यांनी खासदारांना भडकावण्याचे काम केले”, असा आरोप जोशी यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला.

हेही वाचा : Congress Views on Savarkar : काँग्रेसचे सावरकरांबद्दलचे विचार कसे कठोर होत गेले?

हेमंत जोशी यांनी तक्रारीत असंही म्हटलंय की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बालासोरचे भाजपा खासदार प्रताप सारंगी आणि फारुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांना धक्का देण्यासाठी जाणूनबुजून बळाचा वापर केला, परिणामी दोघेही खासदार खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तेलगु देसम पार्टीचे नंद्यालचे खासदार बायरेड्डी शबरी यांनी जखमी झालेल्या दोन्ही भाजपा खासदारांवर प्राथामिक उपचार केले. वडोदराच्या खासदाराने असाही दावा केला की, “आम्ही राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कुठलाही प्रतिसाद न देता जाणीवपूर्वक आणि दुष्ट हेतूने हे कृत्य केले.”

राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, भाजपा खासदार हेमांग जोशी यांनी दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत राहुल गांधी यांच्यावर कलम १०९ (हत्येचा प्रयत्न), कलम ११५ (स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), कलम ११७ (स्वेच्छेने दुखापत करणे), कलम १२५ (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे) कलम १३१ (गुन्हेगारी शक्तीचा वापर), कलम ३५१ (गुन्हेगारी धमकी) आणि कलम ३ (५) (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत राहुल गांधी यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, हत्येचा प्रयत्न हे कलम लावण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

राहुल गांधींकडून आरोपांचं खंडन

भाजपा खासदारांनी केलेल्या आरोपांचं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खंडन केलं आहे. ते म्हणाले की, “आम्ही मकरद्वाराने संसदेच्या आत चाललो होतो, त्यावेळी भाजपाचे काही खासदार उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. मी कुणालाही धक्काबुक्की केली नाही, उलट मलाच धक्काबुक्की करण्यात आली. आम्ही पायऱ्यांवर उभे होतो. जे काही घडलं आहे ते कॅमेरात कैद झालं आहे. हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत, तसंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपाने केला आहे. आम्हाला संसदेत जाण्यापासून भाजपा खासदार रोखू शकत नाहीत”, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Story img Loader