Uttar Pradesh milkipur bypolls : केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी पत्रकार परिषद घेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येत्या ५ फेब्रुवारीला मिल्कीपूरमध्ये मतदान घेतले जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघ हा अयोध्येतील राममंदिर असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवरून समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद विजयी झाले होते.

२०२४ मध्ये अयोध्येत भाजपाचा पराभव

त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने फैजाबाद मतदारसंघातून अवधेश प्रसाद यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीतही प्रसाद यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव केला. राम मंदिर बांधूनही अयोध्येत भाजपाला पराभव स्वीकारावा लागल्याने याची बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, अवधेश प्रसाद हे लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत गेले आहेत, त्यामुळे त्यांनी मिल्कीपूर विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

delhi assembly election 2025
लालकिल्ला : भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!
Wax gourd cabbage onion
कांदा,कोबी आणि कोहळा हे त्रिकुट तुम्हाला कसं निरोगी…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना; कारण काय?
BJP wins the Milkipur bypoll, defeating SP and avenging the Ayodhya Lok Sabha defeat.
भाजपाने घेतला ‘अयोध्या’ पराभवाचा बदला, मिल्कीपूर पोटनिवडणुकीत मोडून काढले सपाचे आव्हान
Ajit Pawar praises Amit Shah's hard work despite NCP's defeat in the 2025 Delhi Assembly elections.
NCP In Delhi Election : दिल्लीत राष्ट्रवादीला एकही जागा नाही, तरीही अजित पवार म्हणाले, “अमित शाह यांचं कष्ट…”,
Radhakrishna vikhe patil
अण्‍णा हजारे यांच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने प्रायश्चित्त करायला लावले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Arvind Kejriwal election result
मोदी, मध्यमवर्गीयांच्या बळावर दिल्लीत भाजपचे डबल इंजिन! केजरीवाल, ‘आप’ पराभवातून कसे सावरणार?
Mohan Singh Bisht
Mohan Singh Bisht: मुस्लिमबहुल मुस्तफाबादमधून विजयी होणारे भाजपा नेते मोहन सिंह बिश्त कोण आहेत?

हेही वाचा : Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास

समाजवादी पार्टीकडून कुणाला उमेदवारी?

समाजवादी पार्टीने या जागेवरून अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, भाजपाने या पोटनिवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून अयोध्यामधील पराभवाचा बदला घेण्याचं ठरवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशातील ९ जागांसाठी नोव्हेंबरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय

या पोटनिवडणुकीत भाजपाने तब्बल ६ जागांवर दणदणीत विजय मिळवत पुनरागमन केले. तर समाजवादी पार्टीला फक्त दोनच जागा जिंकता आल्या. याशिवाय एक जागा राष्ट्रीय लोक दलाने जिंकली. समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडरकी विधानसभा मतदारसंघातही भाजपाने विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे, या मतदारसंघात सर्वाधिक मतदार हे मुस्लीम होते.

दरम्यान, मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव जोरदार प्रचाराला लागले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी या निवडणुकीला महत्व प्राप्त झालं आहे. अयोध्येतील फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून अवधेश प्रसाद यांनी विजय मिळवल्यानंतर समाजवादी पार्टीने भाजपाला वारंवार डिवचण्याचं काम केलं होतं. आता मिल्कीपूरच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून भाजपा पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे.

मिल्कीपूर मतदारसंघात सपाचा बालेकिल्ला

मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात हा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाला गेल्या तीन दशकांत फक्त एकदाच येथे विजय मिळवता आला आहे. २०१७ मध्ये मोदी लाटेत भाजपाने मिल्कीपूरची जागा जिंकली होती. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने पुन्हा ही जागा आपल्याकडे खेचून आणली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन दिवसांपूर्वी अयोध्या दौरा करत मिल्कीपूर येथील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा अजेंडा ठरवला आणि संयुक्त आघाडी स्थापन करण्याचे आदेश दिले.

“भाजपा मुस्लीम बहुल कुंडरकी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवू शकतो, तर मिल्कीपूरची पोटनिवडणुकही जिंकू शकतो”, असे प्रोत्साहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले. समाजवादी पार्टीने भाजपाच्या कुंडरकी येथील विजयावर शंका घेत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. मंगळवारी ‘सपा’ प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, “मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कुठलाही गैरप्रकार होणार नाही, अशी आम्हाला आशा आहे.”

हेही वाचा : Delhi Elections 2025 : भाजपाला दिल्ली दूरच… ‘आप’ने दशकभर वर्चस्व कसं राखलं?

भाजपाकडून कुणाला उमेदवारी मिळणार?

दरम्यान, मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ‘सपा’कडे अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांच्यासारखा दलित चेहरा आहे. त्यामुळे भाजपाही दलित उमेदवारालाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मिल्कीपूर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बाबा गोरखनाथ यांनी विजय मिळवला होता. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अवधेश प्रसाद यांनी १३ हजार मताधिक्याने पराभव केला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण ५ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी मिल्कीपूरची जागा सोडून इतर ४ मतदासंघात भाजपाने २०२२ मध्ये विजय मिळवला होता.

भाजपा विरुद्ध समाजवादी पार्टी थेट लढत

मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध समाजवादी पार्टी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. कारण, मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे काँग्रेसने समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीने काँग्रेसला ९ पैकी केवळ २ जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेत एकाही जागेवर उमेदवार दिला नव्हता.

मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नोव्हेंबरमध्येच घेण्यात येणार होती. परंतु, या जागेवरील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीबाबतची याचिका न्यायालयात प्रलंबित होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने फक्त ९ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यामुळे मिल्कीपूर विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून भाजपा अयोध्येतील पराभवाचा वचपा काढणार की पुन्हा समाजवादी पार्टी बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Story img Loader