महेश सरलष्कर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भाजपची सर्वोच्च निर्णय समिती असलेल्या संसदीय मंडळाची आज बैठक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. विरोधकांचा उमेदवार रविवारी होणाऱ्या बैठकीत ठरेल. मंगळवारी (१९ जुलै) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. ११ ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. उपराष्ट्रपतीपदासाठी माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची आधीपासून चर्चा होत असली तरी संघ परिवारातून नक्वींच्या नावाला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य नावांचाही विचार केला जात असल्याचे समजते. त्यामुळे भाजपने अर्ज भरण्यासाठी दोन दिवस उरले असताना उमेदवारी निश्चित करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा- यवतमाळच्या नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी; परिणाम मात्र शून्य
नक्वी यांच्यासह पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, केंद्रीयमंत्री हरदीप पुरी, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, माजी मंत्री एस. एस. अहलुवालिया, नजमा हेपतुल्ला, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यासह अगदी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपचे खासदारांसाठी स्नेहभोजन
राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची निवड केल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी ओबीसी, उच्चवर्णीय वा शीख समाजातील व्यक्तीलाही स्थान दिले जाऊ शकते, असेही मानले जात आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून शनिवारी रात्री भाजपच्या खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानाबाबत खासदारांना सूचना दिल्या जातील. या स्नेहभोजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. सोमवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्यामुळे शनिवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतील गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.
हेही वाचा- हिंगोलीत मुख्यमंत्र्यांकडून बांगर यांना बळ; पण शिवसैनिक ‘मातोश्री’ च्या पाठीशी
विरोधकांनीही उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अजून निश्चित केलेला नाही. मात्र, उद्या, रविवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर विरोधकांची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासंदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रविवारी दिल्लीत दाखल होणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठीही विरोधकांना तगडा उमेदवार मिळाला नव्हता. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी सर्वसंमत उमेदवाराच्या निवडीतही दिरंगाई होत असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावाची चर्चा होत असली तरी, काँग्रेसच्या नेतृत्वाची संमती मिळण्याबाबत साशंकता आ
विरोधक मात्र साशंक