कर्नाटकमध्ये आगामी मे महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यांनी केली आहे. बंगळुरूमध्ये आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलते होते. यावेळी बोलताना त्यांनी जेडी(एस) युतीबाबत अफवा पसरवत असल्याचा आरोपही केला. तसेच कर्नाटकमध्ये भाजपा पुन्हा सरकार बनवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्ती केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “काँग्रेसवाले एवढं ज्ञान कसं सहन करतात?” राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर भाजपाचा खोचक टोला!

काय म्हणाले अमित शहा?

“काही लोकांकडून जेडी(एस) आणि भाजपाची युती होणार असल्याची अफवा परसवली जात आहे. जेडी(एस)ला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार आहे”, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिली. तसेच कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावं, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा – Video: “मी तुम्हाला लिहून देतो की मध्य प्रदेशात…”, राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपा…”

काँग्रेवरही केली टीका

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेवरही टीकास्र सोडले. “काँग्रेसला सत्ता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी हवी आहे. मात्र, आम्ही सत्तेचा वापर लोकांचे जीवनमान उंचावण्याठी करतो. जनतेच्या भल्यासाठी करतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच झालेल्या सात राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला सहा राज्यात पराभव स्विकारावा लागला आहे”, असे ते म्हणाले. दरम्यान, तत्पूर्वी त्यांनी बूथस्थरावरील कार्यकत्यांची बैठकही घेतली. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will contest assembly elections on its own in karnataka said amit shaha spb