पाटणा येथे २३ जून रोजी विरोधकांची एकत्रित बैठक झाली आणि त्यानंतर बिहारच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद बिहारमध्ये पाहायला मिळाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडी(यू)च्या आमदारांशी समोर समोर बैठक घेतली. ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपाप्रणीत आघाडीत जाण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर जमीनीच्या बदल्यात नोकरी या घोटाळ्यातील आरोपपत्रात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे नाव जोडण्यात आले. २०१७ साली तेजस्वी यादव यांचे नाव भ्रष्टाचार प्रकरणात गोवण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी महागठबंधन सोडून भाजपाशी आघाडी करून सत्ता स्थापन केली.

बिहारमधील आणखी एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) नेते आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी द इंडियन एक्सप्रेसला बिहारमधील घडामोडीबाबत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी भाजपाशी आघाडी, नितीश कुमार यांची एनडीएमध्ये परतणे आणि त्यांचे काका आणि केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्यासोबत जुळवून घेण्याबाबत भाष्य केले.

Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

प्र. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या खासदार, आमदारांशी बैठका घेत आहेत, याकडे कसे पाहता?

चिराग : नितीश कुमार स्वतःचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या महत्त्वकांक्षा प्रकट करण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मत्सर करत असतात. आपल्या मत्सराच्या आधारावर ते राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ इच्छितात. जर गुजरातचा तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती पंतप्रधान बनू शकतो, तर मी का नाही? असा प्रश्न नितीश कुमार यांच्या मनात निर्माण होतो. विशेष म्हणजे बिहार सारख्या हिंदी पट्ट्यातील महत्त्वाच्या राज्याचे ते १७ वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावरील ईर्षेमुळेच त्यांनी २०१३ साली राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा नितीश कुमार महागठबंधनमध्ये होते, तेव्हा राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे त्यांच्यावर भारी पडल्याचे दिसल्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाची वाट धरली. पण पुन्हा एकदा त्यांच्या मनात राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वकांक्षा जागी झाली आणि अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतला.

प्र. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा यु-टर्न घेतला तर काय? लोजप (आर) अशा परिस्थितीत कुठे असेल?

चिराग : नितीश कुमार यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते कितीही वेला यु-टर्न घेऊ शकतात. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची परिस्थिती काल्पनिक आहे आणि माझे काल्पनिक उत्तर आहे की, भाजपाने त्यांच्यासाठीचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे अनेकवेला बोलून दाखविले आहे. जर असे झाले की नितीश यांना भाजपाने पुन्हा स्वीकारले तर माझ्यासह इतर पक्ष पुन्हा एकदा भाजपापासून बाजूला होऊ. मग भाजपाला ठरवावे लागेल की, नितीशच्या बदल्यात त्यांना तीन ते चार संभाव्य मित्र गमवायचे आहेत का?

प्र. अशी परिस्थितीत तुमच्या आणि भाजपाच्या आघाडीची चर्चा कुठवर आली आहे? आणि तुमचे काका, केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस आणि तुम्ही एकत्र येणार का?

चिराग : आम्ही आघाडी करण्याबाबत चर्चा करत आहोत. हा फक्त आता वेळेचा प्रश्न आहे. तसेच माझे काका यांच्यासोबत एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. लोजप (रामविलास) पक्ष हा त्यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाशी कधीही आघाडी करणार नाही. अशा विषयांवर सहसा वरिष्ठांनी चर्चा करायला हवी आणि माझ्या काकांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले की, आमची आघाडी अशक्य आहे. भाजपाने माझ्यावर त्यांच्याशी जुळवून घेण्याबाबत दबाव टाकलेला नाही, ही केवळ एक अफवा आहे. याउलट काकांच्या पक्षातलेच काही खासदार माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांना लोजप (रामविलास) पक्षातून निवडणूक लढवायची आहे.

प्र. तुमची आई रिना पवार या दिवंगत रामविलास यांच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार का? सध्या या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तुमचे काका आहेत?

चिराग : जर माझ्या आईने हाजीपूर येथून निवडणूक लढविली तर मला आनंदच होईल. माझ्या वडीलांच्या मतदारसंघासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मी आईलाच पहिले प्राधान्य दिले होते, पण ऐनवेळी तिने माघार घेतली. पण एक नक्की यावेळी आम्ही या मतदारसंघातून निवडणूक लढविणारच. हा मतदारसंघ बांधण्यासाठी माझ्या वडीलांनी अनेक वर्ष प्रयत्न केलेले आहेत. हाजीपूरमधून निवडणूक लढविण्यासाठी माझ्या आईची मी समजूत घालेल. आम्ही हाजीपूर आपल्या हातून सोडणार नाही.

प्र. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची फोडाफोड होत आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांना फोडले गेले आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यातील आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. याबद्दल काय वाटते?

चिराग : राजकीय पक्ष त्यांच्या अंतर्विरोधामुळे कमकुवत होत आहेत. जनता दल (यूनायटेड) पक्षालादेखील फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, असे काही लोक सांगत आहेत. पण वास्तव पाहिले तर लक्षात येईल, २०२० च्या निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमाकांवर फेकला गेला. मी नितीश कुमार यांना याआधी एवढे चिंताग्रस्त कधी पाहिले नाही. महाराष्ट्रात जे झाले, त्यामुळेच ते त्यांच्या खासदार आणि आमदारांसह समोरासमोर बैठका घेत आहेत.

प्र. जर जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) पक्ष एनडीएमध्ये परतला तर दलित नेता म्हणून तुमच्या स्थानाला धक्का बसेल?

चिराग : अजिबात नाही. उलट हिंदुस्तानी अवाम मोर्चा एनडीएमध्ये आला तर आमचा मुद्द्याला आणखी बळकटी मिळेल. आम्ही कोणत्याही एका समाजाचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करत नाही आहोत. तुम्ही माझ्या सर्व जाहीर सभा बघा, त्यामध्ये तुम्हाला सर्व जाती-धर्माच्या नेत्यांचे प्रतिनिधित्व दिसेल. मी सध्या ग्रामीण भागात जाऊन बैठका घेत आहे. “बिहार प्रथम, बिहारी प्रथम” माझ्या या घोषवाक्याला संपूर्ण बिहारमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Story img Loader