आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडून ‘ग्रामपरिक्रमा यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे १२ फेब्रुवारी रोजी मुजफ्फरपूर येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित केल्यानंतर या यात्रेला हिरवा कंदील दाखवतील. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील उपस्थित राहणार आहेत. या यात्रेद्वारे देशभरातील जवळपास दोन लाख गावांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे भाजपा ज्या ठिकाणाहून या यात्रेची सुरुवात करणार आहे, ते मुजफ्फरपूर शेतकरी आंदोलनाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे भाजपाच्या या यात्रेकडे राजकीय दृष्टिकोनातूनही बघितले जात आहे. या यात्रेदरम्यान शेतकऱ्यांकडून त्यांच्या समस्या आणि अपेक्षाही जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे. भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रमुख तथा फत्तेपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चहर यांनी या यात्रेचे आयोजन केले आहे.

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

हेही वाचा – ‘राम मंदिरा’मुळे समाजवादी अडचणीत, आमदारांमध्ये दुफळी; पक्षाची नेमकी भूमिका काय?

या संदर्भात बोलताना चहर म्हणाले, “आम्ही काही दिवसांपूर्वीच ग्रामपरिक्रमा यात्रेची योजना आखली होती. ही यात्रा १२ फेब्रुवारीपासून सुरू होईल. या यात्रेदरम्यान जवळपास दोन लाख गावांना भेटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक गावात फिरून आम्ही तेथील ग्रामदेवतेची, तसेच शेतकऱ्यांच्या गाई व ट्रॅक्टरची पूजा करू. त्याशिवाय शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेऊ. त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या सूचना आम्ही जे. पी. नड्डा यांना पाठविणार असून, त्यांचा समावेश भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात करण्यात येईल.

पुढे ते म्हणाले, “आम्ही एका दिवसात जवळपास ४,५०० गावांना भेटी देणार असून, ही यात्रा एक महिन्यात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, त्यापूर्वी निवडणूक जाहीर झाल्यास ही यात्रा आम्ही स्थगित करू. या यात्रेदरम्यान आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आणि कडधान्य पिकविण्याचे आवाहन करणार आहोत. कडधान्य हे आरोग्यासाठी महत्त्वाचे असून, त्यासाठी पाणीदेखील कमी लागते. तसेच शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही चांगला मिळतो.”

दरम्यान, भाजपाने त्यांच्या शेतीशी संबंधित धोरणांना हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. त्यानुसार भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा मुजफ्फरपूरमध्ये गाई आणि ट्रॅक्टर यांची पूजा करतील. यावेळी ते शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भाजपाच्या जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यालयात जवळपास ३०० शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी जे. पी. नड्डा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मानही करतील.

भाजपाकडून ही यात्रा काढण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे भारतातील एकूण लोकसंख्येत शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या शेतकऱ्यांची मते आपल्याकडे वळविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. दुसरे कारण म्हणजे तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या मनात मोदी सरकारबद्दल नाराजी आहे आणि ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे.

हेही वाचा – लिव्ह इन रिलेशनशिप ते बहुपत्नीत्व; उत्तराखंडमधील समान नागरी कायद्यात नेमक्या तरतुदी काय?

दरम्यान, ही यात्रा मुजफ्फरपूरमधून सुरू करण्यामागेही महत्त्वाचे कारण आहे. या भागात जाट समाज मोठ्या प्रमाणात असून, त्यात मुख्यत: शेतकरी आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनात जाट शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्याशिवाय या आंदोलनचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत हेदेखील मुजफ्फरपूरच्या सिसौली गावातील रहिवासी आहेत. त्यामुळेच भाजपाने ही यात्रा सुरू करण्यासाठी मुजफ्फरपूरची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Story img Loader