मोहनीराज लहाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नगर : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी खेळी करत राष्ट्रवादी व काँग्रेसची नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्ता उलथून लावली आणि जिल्हा बँकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकवला. बँकेच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री, भाजपनेते शिवाजी कर्डिले विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची चार व काँग्रेसचे एक अशी पाच मते फुटली.राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार काँग्रेस नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. जिल्हा बँकेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर अंकुश ठेवण्याची भाजपने व्यूहरचना आखली आहे.

हेही वाचा >>>महिलेबरोबरचा २२ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल… आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सापडले अडचणीत

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर जिल्हा भाजपचे पालकत्व स्वीकारल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीला दिलेला हा दुसरा धक्का असल्याचे मानले जाते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी करण्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यातून फडणवीस-विखे यांच्या खेळीने जिल्हा बँक निसटली. यानिमित्ताने प्रथमच साखर कारखानदार नसलेल्या नेत्यास नगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले आहे.

जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे १०, काँग्रेस चार, विखेप्रणित व भाजप यांचे प्रत्येकी तीन असे एकूण सहा व एक अपक्ष (सेनापुरस्कृत अपक्ष आमदार शंकरराव गडाख) असे एकूण २१ संख्याबळ होते. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने अध्यक्षपद व काँग्रेसने उपाध्यक्षपद मिळवले. मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपचे कर्डिले यांना १०, राष्ट्रवादीचे उमेदवार, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मिळाली तर एक मत बाद झाले. राष्ट्रवादीच्या फुटलेल्या चारपैकी एक मताचे नाव कर्डिले यांनीच (अमित भांगरे) जाहीर केले.

हेही वाचा >>>समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?

अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व काँग्रेसचे माजी मंत्री थोरात यांनी काल एकत्रित संचालकांची नगरमध्ये बैठक घेतली. माजी आमदार घुले यांच्यासह माजी राहुल जगताप, माजी आमदार भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर आदी इच्छुक होते. शिवाय इतरांचाही चंद्रशेखर घुले यांच्या नावाला विरोध होता. त्याची कारणे जिल्हा परिषदेच्या अर्थकारणात दडलेली आहेत. एकमत न झाल्याने अजित पवार यांनी दुसऱ्या दिवशी, आज सकाळी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांच्याकडे नाव कळवू असे सांगितले. त्यानुसार माजी आमदार घुले यांचे नाव निश्चित करण्यात आले आणि घुले यांच्या विरोधातील राष्ट्रवादीमधील असंतोष उफाळला गेला.
शह देण्याचा प्रयत्न फसला

हेही वाचा >>>कृषी आणि सेवा क्षेत्रांत राज्याला फटका, दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर

राज्यात सत्ता असल्याने जिल्हा बँकेचे किमान एक वर्षासाठी अध्यक्षपद भाजपला मिळावे, असा निरोप अजित पवार व बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला होता. मात्र पवार व थोरात यांनी भाजपला वगळून मंगळवारी दोन्ही काँग्रेसच्या संचालकांची बैठक घेतली व अध्यक्षपदाचे नाव निश्चित केले. भाजपला वगळून सुरू असलेल्या जिल्हा बँकेतील राजकारणाचे पडसाद राज्य पातळीवर उमटले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यामध्ये लक्ष घातले. त्याच मंगळवारी रात्री तातडीने त्यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’मार्फत जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत व्यूहरचना रचना ठरली. त्याची जबाबदारी विखे व कर्डिले यांच्यावर सोपवण्यात आली आणि सकाळी कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करेपर्यंत १४ विरुद्ध सहा असे संख्याबळ होते.

प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची चार मते फुटली. एक मत बाद झाले, ते काँग्रेसचे असल्याची चर्चा आहे. घुले व कर्डिले अशा दोघांनाही मते दिल्याने ते बाद झाले. काही दिवसांपूर्वी सहकारमंत्री अतुल सावे नगरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी यापुढे आता भाजप सहकार क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले होते. त्याची प्रचीती एक महिन्यातच आली.

‘पाहुण्यांच्या काठीने…’

नगर जिल्ह्यात ‘सोयऱ्याधायऱ्यां’चे राजकारण जोरात चालते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्याचा उल्लेख पूर्वी नगरमध्येच बोलताना ‘सोधा पक्ष’ असा केला होता. ‘सोधा पक्षा’च्या (सोयऱ्याधायऱ्यांचा पक्ष) राजकारणात पूर्वी शिवाजी कर्डिले आघाडीवर होते. त्यातून त्यांच्यावर नगर शहरात टीका-आरोपही झाले. परंतु आता थोरात- राजळे- घुले- गडाख- तनपुरे अशी राजकारणातील दिग्गज घराणे सोयरीकीने बांधली गेली आहेत. अलीकडेच गडाख व घुले कुटुंबातील तिसरी पिढी विवाह बंधनात अडकली. जिल्हा बँकेतील परिस्थिती पाहता सोधा पक्षाच्या मजबुतीमुळे चंद्रशेखर घुले यांना अडचणीचे कोणतेही कारण नव्हते. मात्र तीच त्यांची प्रमुख अडचण बनली. त्यांच्याविरुद्धच्या पक्षांतर्गत असंतोषाचे तेही एक प्रमुख कारण झाले. ‘सोधा पक्षा’च्या राजकारणावरून कर्डिलेंवर आरोप झाले, त्याच कर्डिले यांनी ‘सोधा पक्षा’चे घुले यांचा पराभव केला. पाहुण्याच्या काठीने साप मारण्यासारखा हा प्रकार घडला.