विक्रमगड विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून भाजपाच्या विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षातील स्थानिक उमेदवाराला यंदा उमेदवारी द्यावी यासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांची उमेदवारी टांगणीला पडली असून विक्रमगडची निवडणूक तिरंगी होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

हेही वाचा >>> नालासोपाऱ्यात महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Ajit Pawar on a secret Adani Amit Shah meeting
राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो!
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी सुनील भुसारा यांनी पालघरचे प्रथम पालकमंत्री दिवंगत विष्णु सवरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सवरा यांचा २१,१९९ मतांनी पराभव केला होता. त्याप्रसंगी देखील स्थानिक उमेदवार देण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली होती. ठाणे येथे वास्तव्य करणारे तसेच त्यावेळी जिल्हा भाजपामध्ये विशेष सक्रिय नसणाऱ्या डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच इच्छुक उमेदवाराने बंड पुकारले होता. वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर बंड क्षमविण्यास यश लाभले तरी त्याप्रसंगी भाजपा उमेदवाराला अपेक्षित मतदान झाले नाही. विद्यमान आमदार सुनील भुसार यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित मानले जात असून या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच काँग्रेस पक्षाची साथ राष्ट्रवादी (शरद पवार) उमेदवाराला मिळेल अशी शक्यता आहे. सुनील भुसारा यांनी आमदारकीच्या कारकीर्दीत अनेक कामे केली असली तरीही काही भागांमध्ये त्यांच्याविरोधात वातावरण आहे. शिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड मतदार संघात विक्रमगड व वाडा तालुक्याच्या भागात भाजपाची झालेली पीछेहाट भरून निघाल्याने भुसारा यांच्यापुढे आव्हान आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारे निलेश सांबरे यांचे आमदार भुसार यांच्यासोबत असणारे संबंध पूर्ववत राहिलेले नाहीत. त्याचाही फटका त्यांना बसण्याची भीती आहे.

हेही वाचा >>> तळोद्यात भाजप आमदाराविरोधात महाविकास आघाडीत इच्छुकांची रांग

शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच ?

दरम्यान विक्रमगडची जागा शिवसेनेला (शिंदे) मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने नव्या दमाचा उमेदवार शोधताना विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे नाव चर्चेत आणले होते. अखेरच्या क्षणी डॉ. हेमंत सवरा यांना उमेदवारी देताना विधानसभेत प्रकाश निकम यांचा सहानुभूतीवर विचार करू असे सांगण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश निकम यांच्याकडे विक्रमगड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. या पार्श्वभूमीवर प्रकाश निकम यांना भाजपा आयात करून त्यांना उमेदवारी देईल अशी दाट शक्यता होती.

स्थानिकाला संधी द्या भाजपाच्या विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुकानिहाय समितीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये स्थानिक उमेदवारालाच संधी द्यावी तसेच भाजपाने इतर पक्षांमधून आयात उमेदवार आणू नये अशा स्वरूपाचा ठराव घेऊन वरिष्ठांकडे पाठविला आहे. भाजपाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा थेतले, गतवेळी इच्छुक असणारे हरिश्चंद्र भोये व मधुकर खुताडे यांची नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. या पार्श्वभूमीवर विक्रमगड मधून निवडणूक लढवण्यास जोरदार तयारी करणारे प्रकाश निकम यांच्यापुढेही आव्हान असणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी या भागात काम केले आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात बहुतांशी मतदार हे अनुसूचित जमातीचे असून या मतदारसंघात असणारा वारली समाज वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागलेला आहे. त्यामुळे वारली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रकाश निकम यांना आपल्या समाजातील मत एकत्रित राखणे आवश्यक ठरणार आहे. त्याचबरोबर सुनील भुसारा (कोकणा) व सुरेखा थेतले ( ठाकूर) या दोन उमेदवारांना देखील आपला समाज बांधव किती प्रमाणात निवडणुकीत प्रतिसाद देतात हे देखील जातीय गणित निवडणुकीच्या रिंगणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.