सुजित तांबडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्याने ‘मिशन बारामती’ मोहिमेला सुरुवात झाली आहे. पवार कुटुंबीयांचे वर्चस्व मोडीत काढून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवणे हा वरकरणी भाजपचा मुख्य हेतू दिसत असला, तरी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये जखडून ठेवणे, हा सुप्त हेतूही या मोहिमेमागे आहे. ही दोन्ही लक्ष्ये साध्य होणार का, हा खरा प्रश्न आहे.
बारामतीसाठी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणे आणि येत्या दोन वर्षांत पवारांच्या ‘फोडाफोडी’च्या नीतीचा अवलंब करत हा मतदार संघ खिळखिळा कसा करायचा, याची व्यूहरचना निर्मला सीतारामन यांच्या या दौऱ्यानंतर भाजपकडून आखली जाणार आहे.
सीतारामन या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये समावेश असलेल्या बारामतीसह खडकवासला, पुरंदर, भोर आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन दिवस दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा आरंभ खडकवासला विधानसभा मतदार संघापासून सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सीतारामन या प्रत्यक्ष बारामती शहर आणि परिसरात जाणार आहेत.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कायम साथ देणारा म्हणून ओळखला जात होता. मात्र, २००९ पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने धोकादायक झाला आहे. त्यामागील कारण म्हणजे या मतदार विधानसभा मतदारसंघांमध्ये शहरीकरणाचे प्रमाण वाढले असल्याने पुण्याबाहेरून आलेल्या मतदारांची संख्या स्थानिक मतदारांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे खडकवासला मतदारसंघापासूनच सीतारामन यांनी दौऱ्याला आरंभ केला आहे.
हेही वाचा… कायदेशीर लढाईतूनच बाहेरच्या राज्यातील पक्ष प्रमुखांना शिवसेनेच्या दोन्ही गटांचे व्यासपीठावर स्थान
या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे असल्याने संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सीतारामन यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारून फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच पदाधिकाऱ्यांनी सविस्तरपणे चर्चा केली. खडकवासलानंतर भोर विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांशी संपर्क साधल्यानंतर शुक्रवारी दिवसभर त्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये असणार आहेत. त्या दृष्टीने भाजपाने तयारी आणि नियोजन केले आहे. जेजुरी देवस्थान येथे भेट दिल्यानंतर त्या बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि अन्य लोकप्रतिनिधींबरोबर बैठक घेणार आहेत. बारामतीमध्ये असलेल्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि व्यापारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. बारामतीतील काही गावांनाही त्या भेटी देणार आहे. तेथून इंदापूरमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
भाजपने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार दुसऱ्या स्थानी असलेल्या किंवा कमी फरकाने पराभव पत्करावा लागलेल्या मतदार केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळेच भाजपने या मतदार संघाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपविली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी २१ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली. या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये निर्मला सीतारामन या बारामतीचा किल्ला कसा सर करता येईल, याचा अंदाज घेणार आहेत. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखली जाणार आहे.
हेही वाचा… शिवसेनेसाठी आर पारची लढाई….
बारामतीत बदल होऊ शकतो ?
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १९८४ पासून बारामतीचे प्रतिनिधित्व केले आहे. पवार हे पाचवेळा, अजित पवार एकवेळा आणि दोनवेळा सुप्रिया सुळे या मतदार संघातून विजयी झाले आहेत. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारामतीत बदल होऊ शकतो, अशी आशा भाजपला वाटू लागली आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप पुरस्कृत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली. त्यामध्ये सुळे यांचे मताधिक्य हे ६९ हजार ७१९ मते एवढेच होते. पवार कुटुंबातील उमेदवाराला लाखापेक्षा कमी मताधिक्याने विजय मिळाल्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा एक लाख ५५ हजार मतांनी पराभव झाला. मात्र, कुल यांना पाच लाख ३० हजार मते मिळाली. ही राष्ट्रवादी काँग्रेसला विचार करायला लावणारी बाब होती. त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा खडकवासला मतदार संघाचा होता. त्यामुळेच खडकवासला मतदार संघात अधिक ताकद लावण्याचे नियोजन भाजपने केले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे इंदापूरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. दौंडमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल हे भाजपच्या साथीला आहेत. पुरंदरकडेही भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने पुरंदर आणि भोरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सीतारामन परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. पुरंदरमध्ये यापूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेची साथ भाजपला मिळेल. भोरमध्ये आतापर्यंत एकदाही भाजपला यश मिळालेले नाही. त्यामुळे सीतारामन यांनी भोरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे.
बारामतीत गावोगावी भेटी
पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतील काही गावांमध्ये सीतारामन या भेटी देणार आहेत. बारामतीत सहकारी संस्थांचे जाळे असल्याने काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा… स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी करा, राज ठाकरे यांनी विदर्भवाद्यांच्या जखमेवर मीठच चोळले
काटेवाडीमधील एक गट फुटला
पवार यांच्या ‘फोडाफोडी’च्या रणनीतीचा अवलंब भाजपनेही सुरू केला आहे. त्याची सुरुवात पवार यांच्या काटेवाडी येथूनच करण्यात आली आहे. काटेवाडीतील एक गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून त्या गटातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बारामती बदल होऊ शकतो, याची चुणूक याद्वारे दिसली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी मुक्काम
पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधता यावा, यासाठी निर्मला सीतारामन यांनी सरकारी निवासस्थान किंवा हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्याऐवजी पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी मुक्काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार बुधवारी त्यांनी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निवास्थानी मुक्काम केला. शुक्रवारी त्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी मुक्काम करणार आहेत.
पवारांचा टोला
निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याबद्दल शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अर्थमंत्र्यांचे बारातमीत स्वागतच केले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली हे बारामतीत येऊन गेले. त्यांनी काय वक्तव्ये केली हे जनतेला अभिप्रेत आहेच. पक्ष वाढविण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. यामुळे सीतारामन आल्या तर त्याचे आश्चर्य काय, असा प्रति सवाल त्यांनी केला.