हर्षद कशाळकर

अलिबाग : शिक्षक परिषदेच्या मतांचे विभाजन रोखण्यात आलेले यश, शिक्षक सेनेच्या माध्यमातून मतदारसंघ बांधणीवर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिलेला भर, भाजपला मिळालेला बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचा पाठींबा आणि शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार शिक्षकच असावा असे केलेले भावनिक आवाहन या गोष्टी कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत भाजपच्या पथ्यावर पडल्या. शेवटच्या क्षणी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली.

Akola Western Hindu votes, BJP problem polarization,
बालेकिल्ला राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान, अकोला पश्चिममध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणामुळे मोठी अडचण
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Raigad, Dilip Bhoir expelled from BJP, Dilip Bhoir,
रायगड : दिलीप भोईर यांची भाजपातून हकालपट्टी
bjp leaders diwali milan function chandrapur
भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका
BJPs efforts to stop the Rebellion therefore aim for victory
विजयाचे लक्ष्य, म्हणून बंडखोरी थंड करण्याचे भाजपचे प्रयत्न
BJP succeeded in pacifying Samrat Mahadiks rebellion in Shirala Constituency
शिराळ्यातील बंडोबाना थंड करण्यात भाजपला यश
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे २० हजार ६८३ मतं मिळवून विजयी झाले. बाळाराम पाटील यांना १० हजार ६६३ मतं पडली. जनता दल युनायटेडच्या धनाजी पाटील यांना १ हजार ४९० मतं पडली. उर्वरित पाच उमेदवार निष्प्रभ ठरले. पहिल्याच फेरी आवश्यक मतांचा कोटा पार केल्याने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी घोषित करण्यात आले.

हेही वाचा… औरंगाबादमध्ये विक्रम काळे यांचे सलग चौथे यश अवघड का बनले ?

गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर सातत्याने भाजप प्रणित शिक्षक परिषदेचे वर्चस्व होते. गेल्या निवडणूकीत शिक्षक परिषदेत झालेल्या मतविभाजनाचा शेकापच्या बाळाराम पाटील यांना फायदा झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर ते या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे भाजप प्रणित शिक्षक परिषदेचे संस्थान खालसा झाले होते. या निवडणूकीत शिक्षक सेनेच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कामगिरी लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे मागील निवडणूकीत झालेल्या चुका टाळून निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतला होता.

हेही वाचा… Maharashtra Latest Breaking News Today : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघीडाचे वर्चस्व; अमरावतीच्या निकालाची अद्यापही प्रतीक्षा

नियोजन बद्ध पध्दतीने निवडणूक लढवली. शिक्षक सेनेच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आयत्यावेळी पक्षात घेऊन पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. यामुळे भाजपवर आयात उमेदवाराला उमेदवारी देण्याची वेळ आली म्हणून टिकाही झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे शिक्षक परिषदेच्या वेणूनाथ कडू यांना निवडणूकीतून माघार घेण्यास भाग पाडून, शिक्षक परिषदेच्या मतांची विभागणी होणार नाही याची दक्षता घेतली. शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार हा शिक्षकच असला पाहीजे हा भावनिक मुद्दा प्रचारात लावून धरला. ज्ञानेश्वर मात्रे हे पेशाने शिक्षक असल्याने तसेच मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष कार्यरत असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला. शिक्षक आणि शिक्षण संस्था चालक यांच्यातील लढत असे चित्र मतदारांपुढे तयार करण्यात भाजपला यश आले. या निवडणूकीचे रणनितीकार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र पाटील यांचा अचूक वापर करून घेतला.

हेही वाचा… मुंबईवर हल्ला करण्याची धमकी; एनआयएला ई-मेल आल्यामुळे यंत्रणा सतर्क

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा चांगली मदत होईल याची दक्षता घेतली. उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, भरत गोगावले यांनाही प्रचारात उतरवले. शिक्षक मतदारांना निरनिराळी प्रलोभनं देण्यातही कुठलीही कसर सोडली नाही. याचा एकत्रित परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. त्यामुळे खालसा झालेले कोकण शिक्षक मतदारसंघाचे संस्थान पुन्हा काबीज करण्यात भाजपला यश आले.

बाळाराम पाटील यांच्या पराभवाची कारणे…

सहा महिन्यात मतदार संघावर प्रभाव टाकण्यात बाळाराम पाटील अयशस्वी ठरले. शेकापच्या चिन्हावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय चांगलाच फसला. महाविकास आघाडीतील नेते बाळाराम पाटील यांच्या प्रचारात फारसे सक्रीय दिसले नाहीत. रायगड जिल्हा सोडल्यास पक्षाचा ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात फारसा प्रभाव नसल्याने मतमिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या.

एकुण झालेले मतदान ३५ हजार ०६९

बाद झालेली मतं १ हजार ६१९

एकूण वैध मतं ३३ हजार ४५०

निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा १६ हजार ७२६

ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप २० हजार ६८३

बळाराम पाटील अपक्ष १० हजार ९९७

धनाजी पाटील जनता दल (यु) १ हजार ४९०

उस्मान रोहेकर अपक्ष ७५

तुषार भालेराव अपक्ष ९०

रमेश देवरुखकर अपक्ष ३६

राजेश सोनावणे अपक्ष ६३

संतोष डामसे अपक्ष १६