लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जालना : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्यानिमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जालना जिल्हा दौरा नुकताच झाला. दौऱ्यात परभणी लोकसभा मतदारसंघ आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांची पेरणीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झाली.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात. आतापर्यंत शिवसेना-भाजप युती असताना नेहमीच परभणी लोकसभा मतदाररसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. आता उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत परभणीमधून भाजपचा उमेदवार असेल, हे गृहीत धरून जालना जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांची या संदर्भातील अपेक्षा लपून राहिलेली नाही. राहुल लोणीकर यांच्यावर सध्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्या शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारदौऱ्याच्या वेळी परतूर येथे त्यांचा आणि सोबत त्याला जोडून राहुल लोणीकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा… कोल्हापूरमध्ये भाजपची अशीही खेळी

परतूर येथे शिक्षक मतदारांच्या मेळाव्याव्यतिरिक्त युवक मेळावा आणि बावनकुळे यांच्या जाहीर सत्कारास मोठी गर्दी होती. बबनराव आणि राहुल लोणीकर यांचे राजकीय महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने बावनकुळे यांच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यांनीही लोणीकर पिता-पुत्रांचे जाहीर कौतुक केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बावनकुळे यांच्या कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा… शिवसेना-वंचितचे भाजपपुढे आव्हान?, रामदास आठवले यांच्या नेतृत्वाची कसोटी

जालना जिल्ह्यातील भाजपच्या वर्तुळात गेल्या महिनाभरात खासगी साखर कारखानदार सतीश घाटगे यांचे नावही चर्चेत आलेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत असलेल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात घाटगे यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या निमित्ताने त्यांचा मतदारसंघातील संपर्क वाढलेला आहे. बावनकुळे बीडच्या दौऱ्यावरून येत असताना अंबड तालुक्यातील वडिगोद्री येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी घाटगे यांच्यामागे पक्षाची शक्ती उभी करण्याचे आश्वासन देऊन घनसावंगी विधानसभेसाठी ते भाजपचे उमेदवार असतील असे संकेत दिले. लवकरच घनसावंगी येथे पक्षाच्या १० हजार कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सहा तास तेथे आपण उपस्थित राहू, असेही बावनकुळे म्हणाले. सध्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांच्याकडे आहे. सलग पाच वेळेस या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : मराठवाडा ग्रीड प्रकल्पाला महाविकास आघाडीने तिलांजली दिली – देवेंद्र फडणवीस

जालना येथील शिक्षक मेळाव्यातही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सतीश घाटगे यांचा आवर्जून उल्लेख केला. दानवे यांनी केलेला घाटगे यांचा उल्लेख मात्र घनसावंगी विधानसभा मतदारसंघाऐवजी परभणी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारीच्या अनुषंगाने होता. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे उपनेते अर्जुन खोतकर आणि त्या पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्याची दखल घेऊन दानवे म्हणाले की, भुतेकर घनसावंगीतून उमेदवार झाले तर सतीश घाटगे परभणी लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार होऊ शकतील. दानवेांनी कुणाची उमेदवारी जाहीर केली नसली तरी त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा मात्र आहे.