गुजरातमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. गुजरातमधील भरुचच्या जागेवरून आम आदमी पक्ष लढत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP ने भरुच लोकसभा मतदारसंघातून चैतर वसावा यांना उमेदवारी दिली आहे. भरुच मतदारसंघातून आपच्या चैतर वसावा यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना मतदारसंघातील काही भागात जाण्याची परवानगी नाही. तिथे त्यांच्या दोन पत्नी प्रचार करीत असून, जनतेपर्यंत पोहोचत आहेत. तसेच वसावा यांच्या दोन पत्नींनी विरोधकांसह भाजपाचे विद्यमान खासदार मनसुख वसावा यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहेत. काँग्रेसने गुजरातमध्ये इंडिया आघाडीतील आपला भागीदार पक्ष आपसाठी दोन जागा सोडल्या होत्या. खरं तर इथले दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या मुलाच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत काँग्रेसनं दोन जागा आम आदमी पार्टीला दिल्या. आदिवासी नेते छोटू भाई वसावा यांनी याच जागेवरून त्यांचा धाकटा मुलगा दिलीप वसावा याला भारत आदिवासी पक्षा(बीएपी)चा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. छोटू यांचा मोठा मुलगा महेश हा एकेकाळी भारतीय आदिवासी पक्षाचा अध्यक्ष होता. परंतु तो आता भाजपात आहे. तसेच एमआयएमसुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.

दिलीप वसावा यांच्या प्रवेशाने चैतर वसावा यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पत्नी शकुंतला (३४)आणि वर्षा(३०) ज्या दोघीही चैतर यांच्या मागे ठामपणे उभ्या आहेत. त्या आधी सरकारी अधिकारी होत्या. गुजरातमधील बहुतांश आदिवासी समुदायांमध्ये बहुपत्नीत्व ही एक मान्यताप्राप्त सामाजिक प्रथा आहे. अनुसूचित जमातींना हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींमधून सूट देण्यात आली आहे. चैतर आणि शकुंतला यांचे १५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचे आणि वर्षाचे लग्न झाले. हे सर्वजण आपापल्या मुलांसह एकत्र राहतात.

Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
Congress city presidents strength for rebellion in Thane
ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

निवडणुकीची रणधुमाळी पाहता तिघांनी आधीपासूनच प्रचाराची रणनीती आखली होती. वर्षा नेत्रंग यांनी तहसील येथे जानेवारीमध्ये झालेल्या मेळाव्यात चैतार वसावा यांचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यात AAP नेते अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान उपस्थित होते. चैतर आणि शकुंतला त्या वेळी वन अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत होते आणि त्यांच्यावर खंडणी, गुन्हेगारी धमकी, प्राणघातक शस्त्राने हल्ला आणि तत्सम आरोप लावण्यात आले होते.

हेही वाचाः “ध्रुवीकरण हाच नरेंद्र मोदींचा अजेंडा”; भाजपा वास्तवातील प्रश्नांपासून दिशाभूल करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

रॅलीमध्ये वर्षा यांनी चैतरचे एक पत्र वाचून दाखवले आणि उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. ज्यात चैतर वसावा यांनी माझे मनोधैर्याचे खच्चीकरण करण्यासाठी असे आरोप लावले जात असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी माझ्याबरोबर पत्नी शकुंतलासह इतरांनाही तुरुंगात टाकले. पण मी लवकरच तुमच्यामध्ये परतेन,” असेही पत्रात म्हटले आहे. त्याच्या पुढच्याच महिन्यात चैतर आणि शकुंतला यांना कोठडीतून सोडण्यात आले, परंतु कोर्टानं त्यांच्यावर काही निर्बंध लादले. त्यांना गृहजिल्ह्यातील म्हणजेच भरुच लोकसभा मतदारसंघातील नर्मदा भागात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. चैतार उर्वरित भरुचमध्ये प्रचार करीत असताना शकुंतला आणि वर्षा नर्मदा भागातील प्रत्येक घरात जाऊन चैतरचा प्रचार करीत आहेत. विशेषत: चैतर वसावा यांच्या डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातही त्यांच्या पत्नी जाऊन प्रचार करीत आहेत.

आदिवासींच्या वनजमिनीवरील हक्क आणि त्यांच्या भागात शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार यासाठी चैतर लढत आहेत. भाजपा सरकारने त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करीत आहेत आणि त्यांना नर्मदा जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तरीही त्यांच्या मतदारांनी त्यांना १ लाखांहून अधिक मतांनी आमदार म्हणून निवडून दिले आहे, असं म्हणत तुमचा लाडक्या चैतरभाईला निवडून द्या, असंही शकुंतला यांनी आवाहन केलं आहे.

शकुंतला यांच्याकडे २०१५ पासून नर्मदा जिल्हा पंचायतीच्या JD(U) सदस्या म्हणून राजकीय अनुभव आहे. सरकारमध्ये असताना त्यांनी आदिवासी विकास विभागाचा एक भाग असलेल्या डेव्हलपमेंट सपोर्ट एजन्सीमध्ये काम केले. वर्षा या एक प्रशिक्षित परिचारिका आहेत. डेडियापाडा येथील सरकारी आरोग्य विभागात त्या कार्यरत होत्या. शकुंतला आणि चैतर यांना अटक झाल्यानंतर वर्षा यांना तात्काळ राजकारणात उतरावे लागले.

शकुंतला आणि वर्षा आता आदिवासींना जय जोहर संबोधत वृद्ध मतदारांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. तसेच त्या तिथल्या स्थानिक आदिवासींशी बोलीभाषेत आत्मविश्वासाने संवाद साधत आहेत. लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य निवड करण्यास सांगत आहेत. तसेच भाजपा आदिवासी विरोधी असल्याचंही लोकांना सांगत आहेत. भाजपा आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेत असल्याचंही त्या म्हणाल्यात. त्या अनेक डोंगराळ प्रदेशातही प्रचार करीत आहेत. त्यांच्या मागे महिलांचा एक गटही आहे. त्या महिलांच्या गटाकडे आपचा पिळवा स्कार्फ आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडूदेखील आहे. शकुंतला आणि वर्षा यांनी पेहरावातही जुन्या आणि नव्या ट्रेंडच्या मिश्रणाची काळजी घेतली आहे. तसेच लवकरच काही गोष्टी सुरळीत होतील, असंही त्या आश्वासन देत असतात. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर आणि घरातील कामे त्वरित आटोपल्यानंतर आम्ही दररोज सुमारे सात गावे कव्हर करीत आहोत आणि या मोहिमेला साथ देत आहोत, असंही वर्षा सांगतात. शकुंतलाला एक मुलगा असून, वर्षाला दोन मुले आहेत. दिवस खूप मोठा असतो, वाढत्या उष्म्यामुळे सूर्यास्तानंतर सार्वजनिक मेळावे घेतले जात आहे. काल आम्ही पहाटे ३ वाजताच्या सुमारास घरी परतलो आणि नंतर जेवण केले. हे कठीण असले तरी गरजेचे आहे, असंही वर्षा सांगतात.

चैतर प्रचाराच्या नियोजनासाठी शकुंतला यांच्यावर विश्वास ठेवत असल्याचंही त्या सांगतात. तर काँग्रेसनेही त्यांनी चांगली मदत केली आहे. चैतरची वाट पाहणाऱ्या मतदारांना त्या दोघींना पाहून दिलासा मिळतो. तसेच चैतरच्या फोटोलही आपच्या सार्वजनिक कार्यक्रमात हार घातला जातो. भाजपाने चैतर यांना खोट्या प्रकरणात अडकवले आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे चैतरलाही अटक करण्यात आली आहे, असंही शकुंतला म्हणाल्यात. वर्षा म्हटल्याप्रमाणे चैतरच्या आमदार निधीतून होत असलेली कामे पाहत आहेत. भाजपाचे खासदार मनसुख वसावा हे चैतरचे मामा असून, गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत आहेत, पण त्यांनी एकही शाळा बांधली नाही. प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. आरोग्य युनिटमध्ये कर्मचारी नाहीत. पर्यटन अभयारण्याच्या नावाखाली आणखी जमिनी संपादित करण्याचा सरकारचा डाव आहे, असं म्हणत त्यांनी हल्ला चढवला आहे.

महेश वसावा यांनी चैतर यांना देशद्रोही संबोधल्याच्या विधानावरही वर्षा यांनी टीका केली. चैतरभाईंना देशद्रोही म्हणणारे ते (छोटू वसावा आणि मुले) कोण आहेत? खरं तर चैतरभाई यांचीच फसवणूक झाली, जेव्हा त्यांना डेडियापाडा येथून बीटीपीचे तिकीट नाकारण्यात आले आणि त्यामुळे त्यांना आपमध्ये सामील व्हावे लागले. छोटूभाई हे आमचे वडील आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो, पण त्यांनी आपल्या मुलाला आमच्या विरोधात उभे करण्याऐवजी आदिवासी समाजाच्या व्यापक हितासाठी चैतरभाईंना आशीर्वाद द्यायला हवा होता. महेशभाई भाजपामध्ये सामील झाल्याबद्दल त्यांनी उत्तर दिले पाहिजे, असाही वर्षा यांनी सवाल उपस्थित केला आहे.