गुजरातमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. गुजरातमधील भरुचच्या जागेवरून आम आदमी पक्ष लढत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP ने भरुच लोकसभा मतदारसंघातून चैतर वसावा यांना उमेदवारी दिली आहे. भरुच मतदारसंघातून आपच्या चैतर वसावा यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना मतदारसंघातील काही भागात जाण्याची परवानगी नाही. तिथे त्यांच्या दोन पत्नी प्रचार करीत असून, जनतेपर्यंत पोहोचत आहेत. तसेच वसावा यांच्या दोन पत्नींनी विरोधकांसह भाजपाचे विद्यमान खासदार मनसुख वसावा यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहेत. काँग्रेसने गुजरातमध्ये इंडिया आघाडीतील आपला भागीदार पक्ष आपसाठी दोन जागा सोडल्या होत्या. खरं तर इथले दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या मुलाच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत काँग्रेसनं दोन जागा आम आदमी पार्टीला दिल्या. आदिवासी नेते छोटू भाई वसावा यांनी याच जागेवरून त्यांचा धाकटा मुलगा दिलीप वसावा याला भारत आदिवासी पक्षा(बीएपी)चा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. छोटू यांचा मोठा मुलगा महेश हा एकेकाळी भारतीय आदिवासी पक्षाचा अध्यक्ष होता. परंतु तो आता भाजपात आहे. तसेच एमआयएमसुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा