आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने देशातील सर्वच राजकीय आणि प्रादेशिक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी नेते पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टी (बसपा) या पक्षानेदेखील ही निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत, अशी या पक्षाची भूमिका आहे. या पक्षातील पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मोठे प्रस्थ असणाऱ्या इम्रान मसूद यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आधी काँग्रेस नंतर सपा, नंतर बसपा

इम्रान मसूद यांचे पश्चिम उत्तर भारतात मोठे राजकीय प्रस्थ आहे. त्यांनी बसपाने विरोधकांच्या इंडिया आघाडीत सामील व्हावे, अशी भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची स्तुती केली होती, याच कारणामुळे शिस्तभंग म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मसूद यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बसपा पक्षात प्रवेश केला होता. बसपात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातील मुस्लीम चेहरा म्हणून पुढे आणण्यात आले होते. मात्र शिस्तभंगाच्या कारवाईखाली त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी लखनौ येथे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीलाही त्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते.

Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी

बसपात प्रवेश करताच मिळाली होती महत्त्वाची जबाबदारी

मसूद हे अगोद काँग्रेस पक्षात होते. मात्र उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर मसूद यांनी समाजवादी पक्षाला रामराम ठोकत बहुजन समाज पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला होता. मसूद यांनी बसपात सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच पक्षप्रवेश करताच त्यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशच्या संयोकजकपदाची जबाबदारी देण्यात आली. यासह त्यांना उत्तराखंडमधील डेहराडून, हरिद्वार, उधमसिंह नगर, नैनिताल या जिल्ह्यांतील मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचाही जाबाबदारी सोपवण्यात आली होती.

मसूद यांच्या हकालपट्टीचे नेमके कारण काय?

बसपाने मसूद यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, हे पत्राद्वारे सांगण्यात आले. या पत्रामध्ये मसूद यांनी आमचा भ्रमनिरास केला. त्यांना शिस्तभंगाबाबत याआधीही अनेकवेळा सूचना देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वत:मध्ये कोणतीही सुधारणा केली नाही. याच कारणामुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे या पक्षात नमूद आहे. बसपाच्या सहारनपूर जिल्हा अध्यक्षांची या पत्रावर सही आहे.

यासह मसूद यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत घरातील सदस्यांन तिकीट मिळावे यासाठी पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, असेही या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

“…तर एकाही जागेवर बसपाचा विजय होणार नाही”

दरम्यान, पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर मसूद यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला प्रतिक्रिया दिली. मी कसलेही पक्षविरोधी काम केलेले नाही. मी राहुल गांधी यांची स्तुती केल्यामुळे तसेच बसपाने विरोधकांच्या इंडिया या आघाडीत सामील होण्याची भूमिका घेतल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. ” २००७ साली बसपा पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. मात्र २०२२ साली हा पक्ष फक्त एकच जागा जिंकू शकला. आपण या अधोगतीबाबत चिंता दाखवली नाही, तर खऱ्या अर्थाने पक्षाची फसवणूक केल्यासारखे होईल. आजघडीला पक्षाने लोकसभेच्या निवडणुका लढवल्या तर एकाही जागेवर या पक्षाचा विजय होणार नाही,” असे मसूद म्हणाले.