बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती आपल्या पक्षात नवसंजीवनी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षातील नेत्यांना ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका, सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>> “BJP-RSS गुरूसमान, त्यांच्यामुळेच मला…”; खोचक टोला लगावत काय म्हणाले राहुल गांधी?
शुक्रवारी (३० डिसेंबर) मायावती यांनी पक्षाच्या स्थानिक स्वराज संस्थाचेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी लखनौ येथे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना वरील आदेश दिले. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत बसपाचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचावे. तसेच भाजपाचा आरक्षणविरोधी विचार लोकांपर्यंत पोहोचावा, असे आदेश मायावती यांनी यावेळी दिले आहेत.
हेही वाचा >>> राहुल गांधींनंतर आता लोकेश नायडू! पदयात्रेच्या माध्यमातून करणार ४ हजार किमी प्रवास; नव्या नेतृत्वाचा उदय होणार?
पक्षाच्या या मोहिमेबाबात बसपाच्या एका पदाधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. “बसपाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा तसेच काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा आरक्षणविरोधी दृष्टीकोन उघड केला जाईल. पक्ष कार्यकर्त्यांकडून छोट्या बैठका घेतल्या जातील. तसेच मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना भाजपाचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक कार्यकर्ता एक ते चार बुथमिटिंग घेईल,” असे बसपाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> गुजरात विजयानंतर आता मिशन कर्नाटक! ‘या’ दोन भागावंर असणार भाजपाचे विशेष लक्ष
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शहरी भागात होणार असल्या तर बसपाकडून ग्रामीण भागातील मतदारांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. काही वर्षांपूर्वी बसपाकडे मौर्य, कुशवाह, राजभर तसेच सैनी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक मोठे नेते होते. मात्र या महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपा आणि समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता बसपाकडून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.