उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक पक्षांकडून आघाडीची शक्यता तपासून पाहिला जात आहे. असे असताना बहुजन समाज पार्टीने (बसपा) मात्र ‘एकला चलो रे’ची हाक दिली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या वर्षी होणाऱ्या विधानसभा तसेच २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका कोणत्याही पक्षाशी युती न करता लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र आघाडी आणि बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात असताना मायावती यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
हेही वाचा >>> ललित मोदींनी मागितली मुकुल रोहतगींची जाहीर माफी, आईचा उल्लेख करत म्हणाले; “रागाच्या भरात…”
कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नाहीत
मायावती यांनी त्यांच्या ६७ व्या जन्मदिनी २०२३ साली कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांतील विधानसभा तसेच २०२४ साली होणारी लोकसभा निवडणूक कोणाशीही आघाडी न करता लढवली जाईल, अशी घोषणा केली आहे. मायावती काँग्रेस तसेच अन्य कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नाहीत. मायावती आघाडीच्या राजकारणाचे महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेसशी हातमिळवणी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी ‘एकला चलो रे’चा नारा देऊन काँग्रेससोबतच्या आघाडीच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
हेही वाचा >>> मोठी बातमी! लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतावादी म्हणून घोषित
२०१८ साली मायावतींनी असाच पवित्रा घेतला होता
सध्या मायावती आघाडी करण्याच्या मनस्थितीत नाहीत. बसपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. असे असले तरी मायावती सुरुवातील युती करण्यास मनाई करतात. मात्र नंतर एखाद्या पक्षाशी युती करून त्या निवडणूक लढवतात, असे काही राजकी जानकार म्हणत आहेत. २०१८ साली मायावतींनी असाच पवित्रा घेतला होता. मात्र २०१९ साली त्यांनी सपाशी हातमिळवणी करून युतीमध्ये निवडणूक लढवली होती.
हेही वाचा >>> Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसिलदारांनी बजावली नोटीस, नेमकं काय आहे कारण
दरम्यान, सद्यस्थितीत बसपा पक्षाचा जनाधार घटला आहे. त्यामुळे हा पक्ष निवडणुकीच्या मैदानात एकटा उतरल्यास फायदा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काळात मायावती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.