Buldhana Assembly Election 2024बुलढाणा : नव्वदीच्या दशकात बुलढाण्यात बऱ्यापैकी स्थिरावलेली शिवसेना कालांतराने जिल्ह्यातही चांगलीच फोफावली. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात शिवसेनेने मोठ्या निवडणुकांत महिलांना कधीच संधी दिली नाही. आता फुटीनंतर का होईना, अखेर महिलेला उमेदवारी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘स्त्री दाक्षिण्य’ दाखविले. ठाकरे गटाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून जयश्री शेळके यांना उमेदवारी देऊन एक विक्रम केला आहे. आता पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या असलेल्या शेळके महिला उमेदवाराच्या विजयाचा विक्रम करतात का, याकडे लाजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जहाल भाषणे ऐकत जिल्ह्यातील सर्वसामान्य बहुजन, ओबीसी प्रवर्गातील युवक सेनेकडे आकर्षित झाले. जिल्ह्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असल्याचा तो काळ. प्रतिकूल परिस्थितीत या युवकांनी भगव्याचा प्रचार-प्रसार केला. बुलढाणा, मोताळा, मेहकर, लोणार सारख्या तालुक्यांत सेनेचा जास्त जोर होता. १९९० च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरे यांची मेहकरमध्ये पार पडलेली जाहीर सभा चांगलीच गाजली. यामुळे जिल्ह्यात काँग्रेससमोर प्रथमच राजकीय आव्हान उभे ठाकले. १९९० च्या लढतीत याचे सेनेला फळदेखील मिळाले. बुलढाणा विधानसभेतून डॉ. राजेंद्र गोडे आणि जळगावमधून कृष्णराव इंगळे हे आमदार झालेत. आताचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना मेहकरमधून हार पत्करावी लागली होती. त्यावेळी शिवसेनेत छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात सहभागी झालेले हे दोन्ही आमदार काँग्रेसमध्ये आले. त्यांना अनेक दिवस भूमिगत राहावे लागले. गद्दारी विरुद्धचा रोष, निषेध मोर्चे, पोलीस बंदोबस्त याचा प्रत्यय जिल्ह्यात तेव्हा पाहवयास मिळाला.

Thane, Palghar, Eknath Shinde,
ठाणे, पालघरमध्ये शिंदे यांची भिस्त आयात उमेदवारांवर ?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Parbhani, Mahavikas Aghadi Parbhani,
परभणी जिल्ह्यात मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली
Pune, Eknath Shinde group Pune, Eknath Shinde group, seat in Pune,
पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या पदरी निराशाच !
Leaders do not come to ask for votes banners at Pangul Colony in Nagpur
नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक
Shiv Sena, Eknath Shinde, assembly election 2024, thane district
ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठरेना
akola vidhan sabha
‘मविआ’च्या जागा वाटपावर राजकीय समीकरण ठरणार, अकोल्यातील पाचपैकी कुणाच्या वाट्याला किती जागा?
no candidate declare from any constituency of washim district in first list of bjp for assembly poll
वाशीम जिल्ह्याला भाजपच्या पहिल्या यादीत स्थानच नाही; इच्छुकांसह विद्यमान आमदारांची धाकधुक वाढली

हेही वाचा >>>शेतकरी संघटनांची ऊसदर आंदोलने यंदा थंड ! आचारसंहितेमुळे निकालानंतर लढाईची तयारी

१९९५ च्या लढतीत बुलढाणामधून विजयराज शिंदे आणि मेहकरमधून प्रतापराव जाधव आमदार झालेत. यानंतर पक्षाने बुलढाणा आणि मेहकरमधून सतत शिंदे आणि जाधव यांनाच संधी दिली. १९९९ च्या लढतीत जिजाऊंच्या माहेरमधून छगन मेहेत्रे यांना संधी मिळाली. २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीनदा शशिकांत खेडेकर यांनाच संधी देण्यात आली. मेहकर मतदारसंघ २००९ मध्ये राखीव झाल्यावर सेनेने संजय रायमूलकर यांना सलग तीनदा संधी दिली आणि ते तीनवेळा आमदार राहिले. २०१९ मध्ये शिंदेंना तिकीट नाकारले, पण दिले ते संजय गायकवाड यांनाच. २००९ मध्ये मेहकर राखीव झाल्यावर जाधव यांना थेट २०२४ पर्यंत लोकसभेत संधी देण्यात आली. २०१४ मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले. खामगाव, जळगाव, मलकापूरमध्ये उमेदवार मिळत नसतानाही पक्षाने महिलांना संधी देण्याचा विचारही केला नाही. पक्षात महिला पदाधिकाऱ्यांची वानवा होती, असेही नव्हते.

हेही वाचा >>>‘कसब्या’त पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने

अन्य पक्षांनी संधी दिली

या तुलनेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीने विधानसभेत महिलांना संधी दिली. काँग्रेसने १९६१ च्या लढाईत इंदिरा कोटांबकर, नंतर सुमन पाटील, जळगावात श्रद्धा टापरे यांना संधी दिली. भाजपने रेखा खेडेकर यांना सलग तीन वेळा आमदारकीची संधी दिली. राष्ट्रवादीने त्यांना २०१४ मध्ये सिंदखेड राजातून उमदेवारी दिली. एवढेच काय स्वातंत्र्यउत्तर काळात जिल्ह्यात प्रबळ असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही तीनदा महिलांना उमेदवारी दिली. या तुलनेत मोठ्या लढतीत शिवसेनेने महिलांना नेहमीच दुर्लक्षित केले.

बुलढाणा जिल्ह्यातील साडेतीन दशकांच्या राजकीय प्रवासात सेनेने महिलांची राजकीय उपेक्षाच केली आहे. मात्र, आता फुटीनंतर का होईना पक्षाने ही कोंडी फोडत जयश्री शेळके यांना बुलढाण्यातून यंदा उमेदवारी दिली आहे. त्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. जिल्ह्यात अस्तित्वाचे आव्हान समोर उभे ठाकलेल्या ठाकरे गटाने शिंदे गटाला शह देण्यासाठी ही मोठी खेळी खेळली आहे. त्यांना विजय मिळाला तर त्या सेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरणार आहेत. तो ३५ वर्षातील पहिला विक्रम ठरणार आहे. अर्थात ही जर-तर आणि निकालानंतरची बाब आहे.