बुलढाणा : जिल्ह्याची राजकीय राजधानी ही चिखलीची पारंपरिक ओळख. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून दोन टोकाच्या विचारधारांचे येथे अस्तित्व राहिले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे केंद्र. यामुळे १९६२ च्या निवडणुकीपासून प्रत्येक लढतीत काँग्रेस विरुद्ध (प्रारंभी) जनसंघ आणि कालांतराने भाजप असा संघर्ष पाहवयास मिळाला. नव्वदीच्या दशकात जिल्ह्यात दमदार आगमन करणारी शिवसेना किंवा अलीकडच्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसला येथे फारसा थारा मिळाला नाही. अजूनही हीच स्थिती आहे.

काँग्रेसची दोन शकले झाल्यावरही इंदिरा काँग्रेस विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरुद्ध जनसंघ अशीच लढत झाली. या संघर्षाची टोकाची चुरस १९७८ च्या लढतीत पाहवयास मिळाली. ती लढत जिल्ह्यातील आजवरची सर्वाधिक चुरशीची तिरंगी लढत ठरली. इंदिरा काँग्रेसकडून लढणारे जनार्दन बोन्द्रे (२७, ७८५मते), भाराकाँचे भारत बोन्द्रे (२७,६०७) आणि भाजपतर्फे लढणारे जनसंघाचे केशवराव बाहेकर ( २७४४७) यांच्यातील विक्रमी लढतीत विजयी उमेदवाराने जेमतेम १३८ मतांनी बाजी मारली. विजयी उमेदवार आणि तिसऱ्या क्रमांकारील बाहेकर यांच्यात ३३८ मतांचा फरक होता. काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपच्या रेखा खेडेकर यांनी १९९५ ते २००४ अशी सलग बाजी मारली. त्यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर २००९ आणि २०१४ च्या लढतीत राहुल बोन्द्रे हे आमदार झाले.

Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान

हेही वाचा :मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा

सुसंस्कृत राजकारण लयास

२०१९ च्या लढतीपूर्वी भाजपमध्ये उमेदवारीसाठी डझनभर इच्छुक होते. मात्र राजकीय महत्वाकांक्षी असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभापती श्वेता महाले यांनी आक्रमकपणे प्रसंगी रस्त्यावर उतरून राहुल बोन्द्रे यांना कडवा विरोध केला. हा राजकीय संघर्ष मुद्यावरून गुद्यावर येत पोलीस आणि दोन पक्षातील जाहीर संघर्षापर्यंत गेला. आधुनिक भाजपने यामुळे महाले यांना मैदानात उतरविले. मागील लढतीपूर्वी बोन्द्रे हे भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली. यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना दिल्लीवरून चिखलीत येत याचे खंडन करावे लागले. अखेर काँग्रेसमध्येच राहिलेले राहुल बोन्द्रे विरुद्ध श्वेता महाले या लढतीत ‘ताईंनी’ बाजी मारली. यानंतर भाऊ आणि ताईंमधील हा राजकीय संघर्ष टोकाला गेला. यंदाच्या रणसंग्रामात हे राजकीय हाडवैरी एकमेकांसमोर मैदानात उतरले आहेत. यामुळे आक्रमक प्रचाराने कळस गाठला आहे.

आमदार महाले यांनी राहुल बोन्द्रे यांच्या अखत्यारितील अनुराधा बँक, सूतगिरणीमधील कथित गैरव्यवहाराचा भांडाफोड केला, जिल्हा सहकारी बँकेच्या बुडीत कर्जावरून रान उठविले. त्याला प्रत्युत्तर म्हणुन बोन्द्रे यांनी मतदारसंघातील पाणंद रस्त्यातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उकरून काढला. याविषयी भाऊ बुलढाण्यात पत्रपरिषद घेत असताना ताईंच्या समर्थकानी थेट बुलढाण्यात दाखल होत घोषणाबाजी केली. बोन्द्रे यांनी सावरगाव डुकरे गावात आंदोलन मांडताच भाजपने लगेच मंडप टाकत प्रतिआंदोलन सुरू केले. यामुळे धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी या दोन विचारधारामधील लढ्याने वैयक्तिक हाडवैराचे स्वरूप धारण केले.

हेही वाचा :महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

जहाल संघर्षाचे प्रचारातही प्रतिबिंब

ताई आणि भाऊ मधील जहाल संघर्ष, टोकाचा विरोध, ‘अरे ला कारे’ चे राजकारण याचे प्रतिबिंब प्रचारातही दिसून येत आहे. प्रचारात एकमेकांविरुद्ध करण्यात येणारे आरोप प्रत्यारोप, जहाल टीका, कार्यकर्त्यांल खुन्नस, उघडपणे दिसून येत आहे. मतदारसंघाचा चौफेर विकास आणि खेचून आणलेला कोट्यवधींचा निधी, दिसून येणारा विकास याबद्धल काँग्रेसही फारसे बोलू शकत नाही. ताईंच्या प्रचाराचा तो मुख्य मुद्दा आणि त्यांची बाजू बळकट करणारा आहे. पाच वर्षांत त्यांनी कायम ठेवलेला जन संपर्क, लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी साठी केलेले सुनियोजित प्रयत्न, भाजपची पारंपारिक मते आणि त्याला ‘सोशल इंजिनिअरिंग’ ची दिलेली जोड, प्राबल्य असलेल्या मराठा आणि राजपूत समाजाचे पाठबळ, ओबीसी समूहांची साथ ही त्यांची ताकद आहे. त्यांनी प्रचाराचे केलेले सूक्ष्म नियोजन, काटेकोर अंमलबजावणी पहिल्या टप्प्यापासून दिसून येत आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली जंगी सभा वातावरण निर्मिती करणारी ठरली.

याउलट काँग्रेसच्या प्रचारात विस्कळितपणा आहे. मात्र बोन्द्रे यांनी मागील पाच वर्षात ठेवलेला जनसंपर्क, केलेली आंदोलने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून केलेली भरीव कामगिरी, दुखावलेल्याना सोबत घेण्याचे, निवडणूकपूर्वी मतदारसंघात केलेल्या यात्रेद्वारे केलेला प्रचार, नामांकनला खासदार मुकुल वासनिक यांनी लावलेली हजेरी, ही जमेची बाजू आहे. २००४ पासून चिखलीत लढविलेल्या निवडणुका, दोनदा मिळवलेली आमदारकी, यामुळे मतदारसंघाचा अभ्यास आणि अनुभव या बाबतीत भाऊ हे ताईंच्या तूलनेत वरचढ आहे.

हेही वाचा :मराठवाड्यात शिक्षकांकडून संस्थाचालकांचा प्रचार !

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ही लढत तुल्यबळ आणि काट्याची लढत सांगावी, अशी आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात प्रचार आणखी आक्रमक होईल. शेवटपर्यंत कोणाच्या प्रचारात सातत्य राहते, साम दाम दंड भेदचा कोण अचूक वापर करतो यावरही निकाल अवलंबून आहे निर्णायक टप्प्यात प्रतिस्पर्धी वर गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा बाँब गोळा पडण्याची शक्यता आहे. तसेच वंचित आणि अपक्ष उमेदवारामुळे होणारे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन, दिग्गज नेत्यांच्या सभामुळे होणारा लाभ, जातीगत ध्रुवीकरण हे देखील निकालातील महत्त्वाचे घटक ठरणार आहे.

Story img Loader